HW News Marathi
देश / विदेश

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा

नवी दिल्ली | भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी १० डिसेंबर २०१८ रोजी उर्जित पटेल यांनी वैयक्तिक कारण पुढे करत आपल्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला होता. खरंतर उर्जित पटेल यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०१९ पर्यंत होता. मात्र, त्यांनी त्यापूर्वीच राजीनामा दिला. विरल आचार्य यांनी देखील आपला कार्यकाळ संपण्याच्या ६ महिन्यांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, विरल आचार्य यांच्या राजीनाम्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झेललं नाही.

विरल आचार्य यांनी आपला कार्यकाळ संपण्यापूर्वीच तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर विरल आचार्य अस्वस्थ असल्याची माहिती मिळते. आरबीआय विरुद्ध केंद्र सरकार अशा पेटलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर “आरबीआयची स्वायत्तता कायम ठेवण्याची आवश्यकता आहे”, असे विधानही विरल यांनी केले होते.

उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर आरबीआयच्या गव्हर्नरपदी रुजू झालेल्या शक्तिकांत दास आणि विरल आचार्य यांच्यात काही प्रमाणात मतभेद असल्याचे देखील पुढे येत आहे. या दोघांनीही पतधोरण निश्चित करण्यासाठी झालेल्या दोन्ही बैठकांमध्ये महागाई आणि विकास दरासंदर्भात मांडलेल्या मतांमध्ये मोठी तफावत असल्याचे समोर आले होते.

उर्जित पटेल यांनी १० डिसेंबर २०१८ रोजी राजीनामा देताना वैयक्तिक कारण पुढे केले असले तरीही केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेमध्ये त्यावेळी निर्माण झालेल्या तणाव त्यांच्या राजीनाम्यास कारणीभूत होता अशी देखील चर्चा होती. नोटबंदी, रेपोदर वाढ या संदर्भातील केंद्र सरकारच्या भूमिकेवर ऊर्जित पटेल यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासूनच ऊर्जित पटेल हे गव्हर्नर पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. तसेच आरबीआयकडे असणाऱ्या अतिरिक्त चलनसाठ्यावरून देखील केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेमध्ये देखील तणाव निर्माण झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दंत कथेतील हिममानव ‘येती’च्या अस्तित्वाला भारतीय लष्कराकडून दुजोरा

News Desk

काँग्रेसला मोठा दिलासा! कर्नाटक न्यायालयाकडून ‘या’ आदेशाला स्थगिती

Darrell Miranda

ताडोबा अभयारण्यातील मीरा वाघिणीचा ‘या’ कारणामुळे मृत्यू

News Desk