HW News Marathi
देश / विदेश

RBIकडून रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सची वाढ; गर्व्हनरची घोषणा

मुंबई | भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अखेर रेपो दरात वाढ केली आहे. आरबीआयने रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सची वाढ म्हणजे 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी आज (30 सप्टेंबर) पत्रकार परिषद गेऊन पतधोरण जाहीर केले.  यामुळे सर्व सामान्यांना सणासुदीच्या काळात ईएमआय वाढला सामना करावे लागणार आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यामुळे नवीन कर्ज महाग झाले आहे. गेल्या महिन्यात आरबीआयने 5 ऑगस्ट रोजी रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सची वाढ म्हणजे 5. 40 टक्के केली होती. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने आता ईएमआय भरणाऱ्यांना मोठा झटका लागणार आहे.

दरम्यान, देशात कोरोना आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील देशांच्या केंद्रीय बँकांच्या आर्थिक धोरणांमुळे मोठे संकट उठले असल्याचे दासांनी पत्रकार परिषदेत म्हणाले. तर वर्ष 2023 मध्ये विकास दर हा 7 टक्के राहण्याचा अंदाज आरबीआरने व्यक्त केला आहे. यापूर्वी आरबीआयने विकास दर 7.2 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर गेल्या पाच महिन्यात आरबीआयने पाच महिन्यात 1. 90 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर याआधी 5.40 टक्के इतके व्याज दर होते. आणि आता या व्याज दरात 5. 90 टक्के एवढे झाले आहेत.

यावेळीगर्व्हनर शक्तिकांत दास म्हणाले, “कोरोना आणि रशिया-युक्रेन युद्धाला सामोरे जावे लागेल. यामुळे जागतिक पातळीवर आव्हानात्मक परिस्थिती असताना सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेने सयंमाने सामना केला. देशात गुंतवणुकीतही सुधारणा दिसून येत आली असून या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत महागाईचा दर 6 टक्के राहण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.”

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पराभवानंतर राहुल गांधींनी अमेठीला दिली पहिल्यांदा भेट

News Desk

भारत-इस्राइल लढणार दहशतवाद्यांविरोधात

News Desk

कश्मीरप्रश्नी विरोधक आक्रमक, संसदेतून केले वॉक आऊट

News Desk