मुंबई | भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इतिहासात आपला पदाचा राजीनामा देणारे उर्जित पटेल हे पहिलेच गव्हर्नर आहेत. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठा ताण निर्माण झाला होता. उर्जित पटेल यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०१९ पर्यंत होता. मात्र, त्यांनी त्यापूर्वीच राजीनामा दिला आहे. केंद्र सरकार सोबत सुरु असलेल्या वादामुळे उर्जित पटेल आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात अशी चर्चा गेले अनेक दिवस सुरु होती. परंतु, काही वैयक्तिक कारणांचा हवाला देत उर्जित पटेल यांनी आपल्या गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला आहे.
“उर्जित पटेल यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदाचा राजीनामा देणे हे केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या बोर्डाचे सर्वात मोठे अपयश आहे”- अखिलेख भार्गव (बिझनेस एडिटर)
RBI Governor Urjit Patel resigned on Monday, citing "personal reasons"
Read @ANI story | https://t.co/Y8vjgcIucM pic.twitter.com/B3qwWxMvoH
— ANI Digital (@ani_digital) December 10, 2018
नोटबंदी, रेपोदर वाढ या संदर्भातील केंद्र सरकारच्या भूमिकेवर ऊर्जित पटेल यांनी आजवर अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासूनच ऊर्जित पटेल हे गव्हर्नर पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. काहीच दिवसांपूर्वी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेमध्ये आरबीआयकडे असणाऱ्या अतिरिक्त चलनसाठ्यावरून देखील तणाव निर्माण झाला होता.
PM Modi on Urjit Patel's resignation as RBI Governor: Dr Urjit Patel is an economist of a very high calibre with a deep&insightful understanding of macro-economic issues. He steered the banking system from chaos to order. He leaves behind a great legacy. We'll miss him immensely pic.twitter.com/sWHkfZh8v3
— ANI (@ANI) December 10, 2018
“उर्जित पटेल हे प्रभावशाली अर्थशास्त्रज्ञ होते. तसेच अर्थव्यवस्थेबाबत त्यांचा अभ्यास दांडगा आहे. उर्जित पटेल यांच्यामुळेच देशाच्या बँकिंग प्रणालीला गतीमानता असून त्यांच्यामुळेच रिझर्व्ह बँकेने आर्थिक स्थैर्य गाठले”, असे मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले आहे.
Urjit R. Patel: On account of personal reasons, I have decided to step down from my current position (RBI Governor) effective immediately. It has been my privilege and honour to serve in the Reserve Bank of India in various capacities over the years (File pic) pic.twitter.com/PAxQIiQ3hV
— ANI (@ANI) December 10, 2018
“मी काही वैयक्तिक कारणामुळे माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नरपद भूषवणं ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट होती”, असे मत उर्जित पटेल यांनी व्यक्त केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.