HW News Marathi
Covid-19

देशात १९९३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली | देशाला दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांत देशात १९९३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे, आता देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३५,०४३ वर जाऊन पोहोचला आहे. तर ६०० कोरोनमुक्त झाले आहेत. देशातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर आता २५.३७ इतका झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे, देशातील जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागण्यात आले आहे. त्यांपैकी रेड आणि ऑरेंज झोन्सकडे विशेष लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना करून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य आणि जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत असेही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

देशात ७५,००० व्हेन्टिलेटर्स तर २.०१ कोटी पीपीई किटसची आवश्यकता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात ७५,००० व्हेन्टिलेटर्सची आवश्यकता असून सद्यस्थितीत १९,३९८ व्हेन्टिलेटर्स उपलब्ध आहेत. तर ६०,८८४ व्हेन्टिलेटर्स ऑर्डर देण्यात आली आहे. तर देशात २.०१ कोटी पीपीई किटसची आवश्यकता असून आम्ही २.२२ लाख किटसची ऑर्डर देण्यात आली आहे. यांपैकी १.४२ कोटी किस्ट्स देशातच तयार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. देशात दररोज १.८७ पीपीई किट्स तयार केल्या जातात.

‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’च्या उत्पादनात वाढ

२.४९ कोटी एन-९५ मास्क देखील मागवण्यात आले आहेत. तसेच ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ टॅबलेटचे उत्पादनही वाढविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ टॅबलेटचे उत्पादन आता १२.२३ कोटींहून वाढून एप्रिल महिन्यात ३० कोटी इतके करण्यात आले आहे. सद्यस्थितीत बाजारात १६ कोटी ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ टॅबलेटपुरवठा केला जातो, अशी माहिती एम्पावर्ड ग्रुप-३चे अध्यक्ष पी डी वाघेला यांनी यावेळी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात एकाच दिवसात ६४ हजारांहून नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

‘दो गज दुरी’ या मंत्राचा वापर करा, पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

News Desk

देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंनी अरविंद केजरीवाल यांनाही टाकले मागे

News Desk