HW News Marathi
देश / विदेश

नीरव मोदीला रेड कॉर्नर नोटीस, इंटरपोलने बजावली नोटीस

नवी दिल्ली | हजारो कोटी रुपयांचा पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा करून भारता बाहेर पळून गेलेल्या नीरव मोदी विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बँकेची १३ हजार कोटी रुपयांची फसवणुक केल्यानंतर हे प्रकरण समोर येताच नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चौकसी याच्या विरोधात विविध तपास यंत्रणा सध्या चौकशी करत आहेत.

नीरव मोदीविरोधात विशेष न्यायालयाच्या अंमलबजावणी संचलनालयाने प्रत्यार्पणाची कारवाई सुरू करण्यास परवानगी दिली होती. ईडीने सोमवारी प्रत्यार्पणासंबंधी अर्जही दिला होता. नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चौकसीविरोधात अनेक सरकारी यंत्रणा तपास करत आहेत. दोघेही परदेशात पळून गेल्यानंतर सीबीआय आणि ईडीने त्यांच्याविरोधात एफआयआरही दाखल केले होते. नीरव मोदीविरोधात हवाला प्रकरणात सुनावणी करत असलेल्या विशेष न्यायालयाने ईडीला कारवाईची परवानगी दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील नागपाडा परिसरातील सीएए, एनआरसीविरोधातील आंदोलन मागे

swarit

रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावित व्यवस्थापन मंडळास सहकारी बँकांच्या संघटनांचा तीव्र विरोध

Gauri Tilekar

‘भीतीपोटीच आरबीआयच्या नियंत्रणाला पवारांचा विरोध’, भाजपचा पलटवार

News Desk