HW News Marathi
Covid-19

कोरोनाबाधित रुग्णांवर ‘या’ औषधाचा होत आहे चांगला परिणाम

मुंबई | कोरोनाच्या रुग्णांवर कोणते औषध उपयुक्त ठरेल यासाठी सगळीकडून प्रयत्न सुरू आहे. तसेच जगभरात लस तयार करण्यासाठी देखील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. अशातच रेमडेसिविर अँटीव्हायरल ड्रग हे औषध कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी प्रभावी ठरत असल्याची माहिती मिळत आहे.

अमेरिकेत १०६३ रुग्णांवर या औषधाची चाचणी करण्यात आली. त्यात रेमडेसिविर औषध प्रभावी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रेमडेसिविर औषधामुळे कोरोना रुग्णांच्या प्रकृतीमध्ये वेगाने सुधारणा दिसून येत आहे. शिवाय हे औषध कोरोना विषाणूला ब्लॉक करत असल्याची माहिती मिळत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार असणाऱ्या डॉक्टर अँथोनी फॉउसी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. रेमडेसिवीर औषधांचा वापर करण्यात आलेल्या रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचे अढळून आले आहे, असे फॉउसी यांनी स्पष्ट केले. अमेरिकन एफडीएकडून लवकरच या रुग्णांवर उपचारांसाठी रेमडेसिविर औषधाच्या वापराला परवानगी देण्यात येईल.

प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि आयसीएमआरचे माजी महासंचालक डॉ. निर्मल के. गांगुली यांनी रेमडेसिविरच्या या औषधाच्या निष्कर्षांचा अभ्यास केला आहे. गिलीयड सायन्सेस आता कोरोनाच्या आणखी रुग्णांवर या औषधाची चाचणी करण्यात येणार आहे.

७ देशातील ५,६०० रुग्णांवर रेमडेसिविरच्या चाचण्या घेण्यात येतील. मात्र, यात भारताचा समावेश नाही आहे.भारतात सध्या हे औषध उपलब्ध नाही आहे. आपल्या देशातील नागरिकांना हे औषध उपलब्ध करुन देण्यासाठी भारताने वेगवेगळया पर्यायांचा विचार केला पाहिजे असेही निर्मल गांगुली यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Murlidhar Mohol HW Exclusive : दाट लोकवस्तीमधील लोकांचे स्थलांतर करून कोरोनाचा संसर्ग कमी करणार !

News Desk

तेव्हा भाजपसोबत शिवसेना नसती तर राज्य कारभार अधिक चांगला झाला असता !

News Desk

अदार पुनावाला हे पुण्याचे, महाराष्ट्राला झुकतं माप द्यावे !

News Desk