नवी दिल्ली | अयोध्या राम जन्मभूमी विवादीत प्रकरणी आज (१० मे) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणात नेमण्यात आलेली मध्यस्थी समितीचे अध्यक्ष न्या. एफ.एम.आय. खलीफुल्ला आज समितीचा अहवाल न्यायालयाकडे सोपवणार आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस.ए. बोबडे, न्या. डी.वाय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नजीर या पाच न्यायाधीशांचे घटनापीठ सुनावणी घेणार आहे.
Today in #SupremeCourt |
– SC to hear the Ayodhya case.
– SC to hear contempt plea against Rahul Gandhi for attributing 'Chowkidar chor hai' jibe to the court.
– SC to resume hearing of petitions seeking review of the court's earlier verdict in the Rafale deal. pic.twitter.com/dynB57CsqJ— ANI (@ANI) May 10, 2019
सर्वोच्च न्यायालयात आज मध्यस्थी समितीची चर्चा कुठपर्यंत आली यांचा आढावा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वादावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मध्यस्थ नेमण्यावर सर्वोच्च न्यायालयाने ८ मार्च रोजी शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर आता दोन महिन्यांनी पहिल्यांदाच सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायमूर्ती एफ.एम.आय. खलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय मध्यस्थांची समिती नेमली होती. अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ विधिज्ञ श्रीराम पंचू हे समितीचे सदस्य आहेत. या समितीला ८ आठवड्याच्या आत सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
तसेच कोणतीही माहिती माध्यमांना देऊ नये, अशी ताकीद देखील देण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत या अहवालात कोणती माहिती दिली गेली आहे. याची कल्पना कोणालाही नाही. या पार्श्वभूमीवर आज अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.