नवी दिल्ली । आर्थिक संकटात असलेल्या येस बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहे. या निर्बंधनुसाार येस बँकेतून ग्राहकांना आता फक्त ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत. आरबीआयने येस बँकेवर सध्या फक्त ३० दिवसांचे निर्बंध आणले. आरबीआयच्या या स्थगितीनंतर खातेदार त्यांच्या खात्यातून ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेमध्ये आज (५ मार्च) संध्याकाळपासूनच हे निर्बंध लागू झाले आहेत. हे निर्बंध ३ एप्रिलपर्यंत लागू राहणार आहेत.
Reserve Bank of India: RBI has in consultation with the Central Govt, superseded the Board of Directors of Yes Bank Ltd for a period of 30 days owing to a serious deterioration in the financial position of Bank. Prashant Kumar, ex-DMD & CFO of SBI appointed as the administrator. https://t.co/bBmn5KeekB
— ANI (@ANI) March 5, 2020
५० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढायची असल्यास खातेदारांना आरबीआयची मंजुरी घ्यावी लागणार आहे. खातेदारांना वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्न या तीन कारणांसाठीच ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येईल. मात्र आरबीआयची मंजुरी त्यासाठी घेणे बंधनकारक असणार आहे.
काही महिन्यांपूर्वी आर्थिक अनियमिततेपोटी रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध लादले होते. सुरुवातीला ग्राहकांना महिन्यातून केवळ १ हजार रुपये काढण्याचे निर्बंध लादले होते. मात्र, ग्राहकांचा असंतोष पाहता ही मर्यादा वाढवून ६ महिन्यात १० हजारांवर नेली. हे १० हजार एकावेळी काढू शकता किंवा टप्प्याटप्प्यानी काढू शकते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.