नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात ४० जवानांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. देशभरातून हा हल्ल्यातील शहीदांना आदरांजली दिली जात आहे. देशाला त्यांचा सार्थ अभिमान आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक तरुण भारतीय लष्करात जाण्यास उत्सुक आहेत. भारतीय लष्कराकडून बारामुल्ला येथे १११ जागांसाठी काढलेल्या भरतीसाठी तब्बल २५०० तरुणांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे यात काश्मिरी तरुणांची संख्या लक्षणीय आहे.
Jammu & Kashmir: Several Kashmiri youth take part in an army recruitment drive for 111 vacancies in Baramulla. Bilal Ahmad, army aspirant says, "We will get the chance to sustain our families and serve our nation, what else can one want?" pic.twitter.com/bmtMdYfvsk
— ANI (@ANI) February 19, 2019
आम्हाला देशसेवेची संधी मिळेल !
“आम्ही काश्मीर बाहेर पडू शकत नाही. आमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. आम्हाला संवेदनशील परिसरांमध्ये तैनात केले तर स्थानिकांशी चर्चा करत आणखी चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळता येईल”, असे मत एका काश्मिरी तरुणाने व्यक्त केले आहे. तर “आम्हाला येथे रोजगाराच्या संधी फारच कमी आहेत. आम्ही लष्करात भरती झालो तर आम्हाला देशसेवेची संधी मिळेल, आम्ही आमच्या कुटुंबाच्या रक्षा करू”, असे लष्कर भरतीसाठी आलेला बिलाल अहमद याने म्हटले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.