HW News Marathi
देश / विदेश

श्रीलंकेत बॉम्बस्फोटाचे सत्र सुरूच, पुगोडा शहरात स्फोट

कोलंबो | श्रीलंकेत ईस्टर संडेला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरले. यानंतर आज (२५ एप्रिल) पुन्हा एकदा श्रीलंकेची राजधानी कोलंबोपासून ४० किलोमीटर दूरवर असलेल्या पुगोडा शहरात दंडाधिकाऱ्या न्यायालयाच्या पाठीमागे स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस अधिकारी अधिक तपास करत आहेत.

इस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेमध्ये झालेल्या आठ साखळी बॉम्बच्या स्फोटात ३५९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्‍यामध्‍ये ३९ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. या स्फोटानंतर देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत ६० संशयितांना अटक केली आहे.

इस्लामिक स्टेटने स्वीकारली जबाबदारी

श्रीलंकेतील स्थानिक इस्लामी कट्टरवादी संघटना नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) हिचा या साखळी बॉम्बस्फोटांमागे हात असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, कुठल्याही संघटनेने आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नव्हती. अखेरीस इस्लामिक स्टेटने आज या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘नारायण राणेंची रेल्वेमंत्र्यांची घेतली भेट, कोकणवासियांसाठी तीन महत्त्वाच्या मागण्या’

News Desk

भाजप सरकारला सावरकरांचा सन्मान करण्यासाठी कोणी रोखले होते ?, सामनातून मोदींना सवाल

News Desk

बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची ४० जणांची स्टार प्रचारक यादी केंद्रीय कार्यालयातून जाहीर… 

News Desk