HW News Marathi
देश / विदेश

राजधानी एक्स्प्रेसला ट्रकने दिली धडक

भोपाळ | राजधानी एक्स्प्रेसला थांडला येथे एका ट्रकने धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. ट्रक फाटक ओलांडत असताना हा अपघात झाला आहे. यामध्ये एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरले. गोध्रा आणि रतलाम यांच्या दरम्यान असलेल्या क्रॉसिंगवर हा अपघात झाला आहे. यामध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसली, तरी मोटरमनला गंभीर इजा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

गोध्रा आणि रतलाम यांच्या दरम्यान असलेले फाटक वाहतुकीसाठी बंद होते. राजधानी एक्स्प्रेस जात असल्याने हे फाटक बंद ठेवण्यात आले होते. त्याचवेळी एक ट्रक थेट रुळांवर आला आणि एक्स्प्रेसला धडक दिली. या अपघातात ट्रकच्या चालकाचा मृत्यू झाला. सकाळी पावणे सातच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रकच्या धडकेमुळे एक्स्प्रेसचे दोन डबे रुळांवरुन घसरले. सुदैवानं यात कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मी कर्ज फेडेन पण व्याज देऊ शकणार नाही !

News Desk

हरियाणात दाट धुक्यामुळे ५० गाड्यांचा अपघात

News Desk

मनमोहनसिंग राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत राजस्थान मधून काँग्रेसचे उमेदवार

News Desk
राजकारण

आज दसरा मेळाव्यात काय बोलणार उद्धव ठाकरे?

News Desk

मुंबई | सालाबादाप्रमाणे यंदाही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. सायंकाळी दसरा मेळाव्याला सुरुवात होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे.

दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाकडून काय नवीन भूमिका जाहीर करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवसेना राम मंदिराच्या प्रश्नावर पुन्हा एकदा आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेण्याची शक्यता असल्याची आहे. यांसह उद्धव ठाकरे त्यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख घोषित करतील. या भाषणात ते पुन्हा भाजप आणि नरेंद्र मोदींना लक्ष्य करणार की काँग्रेस-राष्ट्रवादी या विरोधी पक्षांचा समाचार घेणार हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related posts

“भाजपचा ताणतणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलंय ‘ते’ वक्तव्य”-नाना पटोले

News Desk

“दादा, तुमचे ऐकत होते म्हणून तर ते आमचे ऐकत नव्हते…”, मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना टोला

Aprna

राज्य सरकारने एवढी घाई करून मेगा भरतीची जाहिरात का केली ?

News Desk