HW News Marathi
देश / विदेश

नवीन वर्षात रोबोट करणार रेल्वेची देखभाल

मुंबई | नववर्षाच्या मुहूर्तावर रेल्वे प्रशासन प्रवाशांसाठी नव्या सुविधा देण्याची तयारी केली आहे. यात प्रवाशांना ट्रेनमध्ये शॉपिंगची सुविधा, रेल्वेच्या देखभालीसाठी रोबोटचा वापर आणि तृतीयपंथीय ज्येष्ठ नागरिकांनाही तिकिटात सवलत अशा सुविधा देण्यात येणार आहे. नवीन वर्षात प्रयागराजमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी खास ८०० ट्रेन चालविण्यात येणार आहे. यात मोफत वायफाय, बायो-टॉयलेट, ऑन बोर्ड शॉपिंग देखील करता येणार आहे.

पश्चम रेल्वेमार्गावर १६ मेल आणि एक्स्प्रेसमध्ये सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत ही सुविधा उपलब्ध असेल. तर शॉपिंग कोर्टमध्ये सौंदर्य, घर आणि किचनमधील सामग्री उपलब्ध होणार आहे. तसेच देशातील पहिली पंचतारांकित रेल्वे स्थानकांची सुरुवात होण्याची योजनाही नवीन वर्षासाठी आखण्यात आली आहे. या गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये या हॉटेलमध्ये १० मजले, ३०० खोल्या असतील.

रेल्वेच्या नागपूरमधल्या अभियंता विभागात एक रोबोट तयार केला आहे. त्याला ‘उस्ताद’ असे नाव दिले आहे. हा रोबोट ट्रेनच्या खालील भागातील पार्टचे फोटो काढेल. त्यात तांत्रिक खराबी असल्यास नोटीस देण्यात येईल. रोबोटमध्ये हाय डेफिनेशन कॅमेरे असून ३२० डिग्रीच्या कोनातून व्हिडीओग्राफी, फोटोग्राफी करण्यास सक्षम आहेत.

तृतीयपंथीय ज्येष्ठ नागरिकांना १ जानेवारी २०१९ पासून रेल्वे तिकिटात सवलत येणार असून ६० वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील तृतीयपंथीय ज्येष्ठ नागरिकांना ४० टक्के सवलत मिळेल. तर ६० वर्षीय आणि त्यापुढील वयोगटातील पुरुष ज्येष्ठ नागरिकांना ४० टक्के तसेच ५८ वर्षीय आणि त्यापुढील वयोगटातील महिला ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्यप्रदेशात लव्ह जिहाद विधेयाकाला मंजूरी

News Desk

पीएमसी बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा, पैसे काढण्याच्या रक्कमेत वाढ

News Desk

पंतप्रधान आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आज कोरोना संदर्भात आढावा बैठक

News Desk