HW News Marathi
देश / विदेश

रोहीत वेमुला दलित नव्हेच!

नवी दिल्ली :आत्महत्या करणारा हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला हा दलित नव्हताच असे न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या या हवालात वेमुलाने वैयक्तिक कारणांनी आत्महत्या केल्याचे तसेच त्याला आणि त्याच्या मित्रांना वसतिगृहातून काढून टाकल्याचा त्याच्या आत्महत्येशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्थापन केलेल्या एकसदस्यीय न्यायालयीन आयोगाने हा अहवाल तयार केला आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. के. रुपनवाल या समितीचे प्रमुख होते. वेमुलालाअनेक कारणांमुळे त्याला नैराश्य आलं होतं,असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. ‘वेमुलाच्या सुसाइड नोटमधून हे स्पष्ट होतं की, त्याला स्वत:च्या समस्या होत्या आणि जगात चाललेल्याघटनांवरही तो नाराज होता. तो ज्या कारणांमुळे नैराश्यग्रस्त होता, ती कारणं त्यालाच ठाऊक असावीत. तोलहानपणापासून एकटा होता. त्याचं कधी कोणी कौतुक केलं नाही.

यामुळेही तो निराश होता. त्याने आत्महत्येपूर्वीलिहिलेल्या चिठ्ठीत कोणालाही दोषी ठरवलेले नाही.तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणी, भाजप नेते बंडारू दत्तात्रय, आणि स्थानिक आमदार रामचंद्रराव हे सरकारी सेवेतली आपली जबाबदारी पार पाडत होते. त्यांनी विद्यापीठ प्रशासनावर कोणताही दबाव आणलानाही. यामुळे हे स्पष्ट होतं की विद्यापीठाची तत्कालीन परिस्थिती रोहितच्या आत्महत्येला कारणीभूत नाही,’ असेया अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी नोकरशाहीला बाजूला सारून निर्णय घेत आहेत | रघुराम राजन

News Desk

अण्णा हजारे यांच्या सामाजिक कामांचा अनुभव हार्दिक पटेलच्या वयाच्या दुप्पट

News Desk

१५ हजार महिलांची सुरक्षित प्रसूती करणाऱ्या पद्मश्री सुलागिट्टी नरसम्मा यांचे निधन

News Desk