HW News Marathi
देश / विदेश

रोटोमॅकचा ८०० कोटीचा घोटाळा

कानपूर | गेल्या काही दिवसात पीएनबी घोटाळाने संपूर्ण देशाची झोप उडवली असताना. अजून एक घोटाळा बाहेर आला आहे. तो म्हणजे रोटोमॅकचे पेनचे मालक विक्रम कोठारी यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. यांनी ८०० कोटींचा बँक घोटळा केल्याचा आरोप केला आहे. विक्रम कोठारी हे ‘पान पराग’ या कंपनीचे संस्थापक एम. एम. कोठारी यांचे चिरंजीव आहे.

बँक ऑफ बडोदाने सीबीआयकडे कोठारी यांच्या विरिधात तक्रार दाखल केली आहे. सीबीआयने कानपूर येथील त्यांच्या संपत्तीवर छापे टाकले आहेत. या घोटाळ्यानंतर कोठारी हे देशातून फरार झाले असल्याची माहिती मिळाली आहे. विक्रम कोठारी यांनी सराकरी बँकातून वर्षभरापूर्वी ८०० कोटी रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाची परत फेड त्यांनी अजूनही केलेली नाही.

‘युनियन बँकने ४८५ कोटींचे कर्ज दिलेले आहे. हे कर्ज वसूल करण्यासाठी कोठारींची संपत्ती बँकेकडे गहाण ठेवलेली आहे. आणि बँक त्यांची संपत्ती विकली जाणार आहे.’ अशी माहिती युनियन बँकेचे मॅनेजर पीके अवस्थी यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आता पाकिस्तानसोबत पुढचा संवाद पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर !

News Desk

तिहेरी तलाकवरून सरकार अडचणीत

News Desk

“चर्चेचे दरवाजे बंद झाल्याचं तुम्ही ऐकलंत का?”, शेतकरी आंदोलनावर प्रकाश जावडेकरांची प्रतिक्रिया 

News Desk
देश / विदेश

मोदींचे मार्गदर्शन ऐकताना जातीय भेदभाव

News Desk

शिमला | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसापूर्वी परीक्षेच्या ताणतणावाचा सामना कसा करावा, यासंदर्भात ‘परीक्षा पर चर्चा’ या कार्यक्रमातुन मार्गदर्शन केले.

या उपक्रमाचे बरेच कौतुकही झाले. मात्र, हिमाचल प्रदेशमध्ये हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या शाळेतील दलित विद्यार्थ्यांना इतरांपासून वेगळे बसवण्यात आल्याचा दुर्देवी प्रकार उघडकीस आला आहे. कुलू येथील चेष्ठा ग्रामपंचायतीच्या शाळेत हा प्रकार घडला.

मोदींच्या ‘परीक्षा पर चर्चा’ या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी शाळेच्या व्यवस्थापकीय समितीच्या अध्यक्षांचे घर निवडण्यात आले होते. मात्र, शाळेचे विद्यार्थी याठिकाणी आले तेव्हा दलित विद्यार्थ्यांना टीव्ही ठेवलेल्या खोलीबाहेर बसायला सांगण्यात आले. याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Related posts

#CoronaInMaharashtra | राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १२२ वर

News Desk

पुण्याच्या हाय एक्सप्लोझीव्ह कारखान्यात वायू गळती

News Desk

Breaking News | NCB कडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक

News Desk