HW News Marathi
देश / विदेश

पुतीन यांनी युक्रेनमधील दोन प्रांतांना दिली ‘राष्ट्र’ची मान्यता; रशिया-युक्रेन युद्ध होणार?

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धजण्य परिस्थिती आहे. यात आता रशियाने युक्रेनसंदर्भात मोठी निर्णय घेतला आहे. रशियाने युक्रेनमधील डॉनेत्स्क आणि लुहान्स या दोन प्रांतांना वेगळे राष्ट्र म्हणून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी मान्यता दिली आहे. यामुळे आता युक्रेन-रशिया युद्ध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर रशियाने युक्रेनमध्ये आपले सैन्य पाठवण्यात आले आहे. तर दुसरीकडे सध्या जगभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

पुतीने काल (२१ फेब्रुवारी) टीव्हीच्या माध्यमातून रशियातील जनतेला संबोधित करताना युक्रेनमधील डोनेत्स्क आणि लुगंस्क या दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून घोषणा केली. यावेळी पुतीन म्हणाले, “युक्रेन हा रशियाच्या इतिहातातील अविभाज्य भाग असून पूर्व युक्रेन हा प्राचीन रशियन भूमी आहे. युक्रेनच्या दोन प्रांताना राष्ट्र करण्याच्या निर्णयाचे रशियामधील जनता स्वागत करेल,” असे मत त्यांनी देशातील जनतेला संबोधित करताना म्हटले.

दरम्यान, “युक्रेन हे अमेरिकेच्या हातचे बाहुले बनल्याचा आरोपही पुतीन यावेळी केला. याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. रशियाला धोका निर्माण करण्यासाठी युक्रेनमध्ये शस्त्रास्त्रांचा उत्पादन करण्यास पाश्चिमात्य त्यांना मदत करत अल्याचे ते म्हटले. तसेच युक्रेनमधील जनतेने यापूर्वी डॉनेत्स्क आणि लुहान्स स्वातंत्र्य राष्ट्र करण्याचा निर्णय घेणे गरजेचे होते, असे पुतीन जनतेला संबंधित करताना म्हणाले. 

संयुक्त राष्ट्र संघामध्ये रशिया-युक्रेन प्रकरणावर भारताचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती म्हणाले, “सध्या रशिया-युक्रेनमध्ये तात्काळ प्राथमिक डी-एस्केलेशन आहे. या ठिकाणांच्या सीमेवर सैन्य वाढवणे हा निर्णय अयोग्य आहे. या परिस्थिती सर्वांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले असून रशिया-युक्रेन प्रश्न हा केवळ चर्चेतून सोडवला जाऊ शकतो, अशी खात्री आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, पत्रकार प्रशांत कनोजियांच्या तात्काळ सुटकेचे आदेश

News Desk

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन

News Desk

नेटीझन्सकडून भारतीय वायू सेनेचे अभिनंदन, सोशल मीडियावर ‘Air Strike’ ट्रेंडिंग

News Desk