नवी दिल्ली | राजस्थानमधील राजकीय अस्थिरता अद्यापही कायम आहे. गेल्या काही दिवसांत यामुळे देशाचे राजकारण ढवळून निघाले. याच पार्श्वभूमीवर, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. “सचिन पायलट गेल्या ६ महिन्यांपासून भाजपसोबत मिळून कट रचत होते. मला माहित होते कि, ते फसवे आहेत. अगदी बिनकामाचे आहेत. केवळ इतरांमध्ये भांडणं लावून देण्याचे काम करतात. तेव्हाही मी याबद्दल बोलायचो मात्र कुणीही विश्वास ठेवला नाही,” अशी टीका गेहलोत यांनी केली.
He (Sachin Pilot) was conspiring from past 6 months with BJP's support. Nobody believed me when I used to say that conspiracy is going on to topple govt. Nobody knew that a person with such innocent face will do such thing. I'm not here to sell vegetables, I am CM: Rajasthan CM pic.twitter.com/Kk4TLJZ0v0
— ANI (@ANI) July 20, 2020
गेल्या अनेक दिवसांपासून राजस्थानात सुरु असलेल्या राजकीय नाट्याच्या आणि सचिन पायलट यांनी पुकारलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अशोक गेहलोत म्हणाले कि, “सचिन पायलट भाजपाच्या मदतीने गेले ६ महिन्यांपासून सरकार पाडण्याचा कट रचत होते. ते अगदीच बिनकामाचे होते. केवळ इतरांमध्ये भांडणं लावत होते. जेव्हा मी याबाबत बोलत होतो तेव्हा कोणीही माझ्यावर विश्वास ठेवत नव्हते. इतका निष्पाप चेहरा असलेली व्यक्ती एवढा मोठा कट रचेल असे कोणालाच वाटले नव्हते. पण मी काय इथे भाजीपाला विकात नाहीये. मी राज्याचा मुख्यमंत्री आहे”, अशी तीव्र प्रतिक्रिया गेहलोत यांनी दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.