जयपूर | राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय अस्थिरता दिसत होती. आज (१४ जुलै) राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरून आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून देखील हटवण्यात आले. यानंतर त्यांनी स्वतः ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ट्विटमध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, सत्याला त्रास दिला जाऊ शकतो हरवले जाऊ शकत नाही, असे त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले आहे.
सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं।
— Sachin Pilot (@SachinPilot) July 14, 2020
आज जयपूरच्या फेअरमाँट हॉटेलमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची दुसरी बैठक झाली. या बैठकीला सचिन पायलट अनुपस्थित होते. त्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले होते. तरीही ते अनुपस्थित राहिले. त्यानंतर आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर रणदीप सूरजेवाला यांनी पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याचा निर्णय जाहीर केला.
तसेच, सचिन पायलट यांनी ट्विटरच्या बायोवरून देखील उपमुख्यमंत्री पद लिहिले होते ते काढून टाकले आहे.
Sachin Pilot changes his bio on Twitter (pic 1) after being removed as Rajasthan Deputy Chief Minister and state Congress unit chief (Pic 2: earlier Twitter bio). pic.twitter.com/ro3UWqOdvN
— ANI (@ANI) July 14, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.