HW Marathi
देश / विदेश

समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरण : मुख्य आरोपी असीमानंदसह तीन आरोपींची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली | समझौता एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोटप्रकरणी मुख्य आरोपी असीमानंद यांच्यासह तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणात पंचकुलामधील विशेष एनआयएच्या न्यायालयाने दिला आहे. मुख्य आरोपी असीमानंद याच्यासह लोकेश शर्मा, कमल चौहान आणि राजेंद्र चौधरी यांची आज (२० मार्च) निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

१८ फेब्रुवारी २००७ रोजी हरियाणातील पानिपतमध्ये समझौता एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. भारत आणि पाकिस्तानला जोडणारी ही ट्रेन अमृतसरमधील अटारी रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात असताना हा स्फोट झाला होता. या स्फोटात समझौता एक्स्प्रेसचे दोन डबे जळून खाक झाले असून या स्फोटात ६८ जणांना प्राण गमवावे लागले होते. या ट्रेनमध्ये बहुतांश पाकिस्तानी नागरिक होते, तर चार भारतीय रेल्वेचे अधिकारी होते.

या प्रकरणात २०१० रोजी असीमानंद यांना अटक करण्यात आली होती. परंतु यानंतर त्यांची सुटका देखील करण्यात आली होती. या प्रकरणात पंचकुला येथील एनआयए न्यायालयात ही सुनावणी सुरू होती. एकूण २९९ पैकी २२४ जणांची या प्रकरणात साक्ष नोंदविण्यात आली.

 

Related posts

सर्जिकल स्ट्राईकचा हिरो लान्स नायक संदीप सिंह यांना वीरमरण

अपर्णा गोतपागर

चीनकडून सरकारविरोधातील वेबसाईडस बंद

News Desk

सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

News Desk