HW News Marathi
देश / विदेश

संघप्रमुख मोहन भागवतांनी माफी मागावी | नवाब मलिक

एक सैनिक तयार करण्यासाठी लष्कराला 6 ते 7महिने लागतात, संघ 3 दिवसात जवान तयार करु शकतो. ही आमची क्षमता आहे, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले. त्यांच्या वक्तव्यवर आपसह राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. भागवतांनी जवानांचा अपमान केला आहे, त्यांनी माफी मागावी, अशी मागणी एनसीपी नेते नवाब मलिक यांनी केली आहे.

रविवारी मुझफ्फरपुर येथे संघ स्वंयसेवकांना संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, ‘सैनिकांना देशसेवेसाठी तयार करण्यासाठी 6 ते 7 महिने लागतात. देशाला गरजपडली तर 3 दिवसांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसवेक सज्ज असतील. ही आमची क्षमता आहे. देशाच्या दुसऱ्या कोणत्याही संघटनेत ती नाही. दरम्यान, राहुल गांधी यांनी देखील भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. देशासाठी शहिद झालेल्या जवानाच्या भागवत यांनी अवमान केल्याची टीका राहुल यांनी केली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहशतवाद वाढविणाऱ्या देशांविरोधात एससीओ सदस्य देशांनी एकत्र यावे !

News Desk

पंतप्रधान मोदींनी घेतली चीनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट

News Desk

अटलजींनी नेहरूंचा हटवलेला फोटो पुन्हा लावायला सांगितला…. आज अटलजींची जयंती !

News Desk