HW News Marathi
Covid-19

केंद्र सरकार १ सप्टेंबर पासून शाळा सुरू करण्याच्या तयारीत !

नवी दिल्ली | कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण ठप्प झाले आहे. मात्र, हळूहळू ते पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. १ सप्टेंबर ते १४ नोव्हेंबर या काळात टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यााचा केंद्र सरकारचा विचार आहे. अनलॉक ४ च्या गाईडलाईन्स ऑगस्टअखेरीस येतील त्यात शाळांबाबतही नियमावली राज्यांना दिली जाऊ शकते, अशी शक्यता आहे.

मार्च महिन्यापासून देशातल्या शाळा बंद आहेत. ऑगस्टमध्ये त्याला ६ महिने पूर्ण झाले. ६ महिने शाळा बंद ठेवल्यामुळे वेगवेगळे शैक्षणिक प्रश्नही निर्माण होत आहेत. शिवाय ऑनलाईन क्लासेसमध्येही अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळेच आता शाळांबाबतचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे, अशी केंद्र सरकारची धारणा आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही याबाबतच्या गाईडलाईन्सवर काम करणार आहे.

काय आहे केंद्र सरकारची योजना –

पहिल्या १५ दिवसांमध्ये १० आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यास सांगितले जाऊ शकते. यानंतर वेळमर्यादेत सहावी ते नववीचे वर्ग सुरु केले जाऊ शकतात. एका इयत्तेतील सर्व तुकड्यांना एकाच दिवशी शाळेत बोलावलं जाणार नाही. प्रत्येक तुकडीला दिवस ठरवून दिला जाईल. याशिवाय शाळा आणि वर्ग सॅनिटाइज करणं अनिवार्य असणार आहे.

शाळांना दोन शिफ्टमध्ये काम करण्यास सांगितले जाऊ शकते. सकाळी ८ ते ११ आणि १२ ते ३ अशी असू शकते. सॅनिटाइज करण्यासाठी एक तास दिला गेला आहे. अद्यापही प्राथमिक आणि पूर्व-प्राथमिक विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्याबद्दल कोणतीही योजना नाही. त्यांना ऑनलाइनच शिकवले जाणार आहे.

बैठकीत सहभागी एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी स्वित्झर्लंड मॉडेल डोळ्यांसमोर ठेवलं आहे. “आम्ही स्वित्झर्लंडसारखे देश ज्यांनी मुलांना सुरक्षितपणे शाळेत आणलं आहे त्यांचा अभ्यास केला. तसंच मॉडेल भारतातही लागू केलं जाईल,” अशी माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रवासी मजुरांना पुढील दोन महिन्यांसाठी मोफत धान्य | निर्मला सीतारमण

News Desk

पुढच्या काही तासांत महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार, ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे स्पष्ट संकेत!

News Desk

मी केलेल्या चुका तुम्ही करु नका, जितेंद्र आव्हाड

News Desk