HW News Marathi
देश / विदेश

गुजरातमध्ये हाय अलर्ट, पाकिस्तानी दहशतवादी समुद्रामार्गे करणार घुसखोरी

नवी दिल्ली |पाकिस्तानी कमांडो किंवा दहशतवादी गुजरात येथील कांडलाम कच्छमार्गे भारतात घुसखोरी करणार असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रेला मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीमा सुरक्षा दल, भारतीय तटरक्षक दल आणि इतर सुरक्षा यंत्रणांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानमधून समुद्रामार्गे दशतवादी भारतात हल्ले करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.

गुप्तचर यंत्रणांना ही माहिती मिळाल्यानंतर बॉर्डर सिक्योरिटी फोर्स, इंडियन कोस्ट गार्ड यांनी गुजरातच्या समुद्रतटावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सर्वच बंदरांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. कमांडो किंवा दहशतवादी छोट्या होड्यांमधून कच्छच्या खाडीतून किंवा सर क्रिकमार्गे गुजरातमध्ये दाखल होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुमारे ६० एसआरपी जवानांना चेकपॉइंट्सवर तैनात करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले. बॅरिकेड्स पार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गाड्यांना रोखता यावे यासाठी चेक पॉइंट्सवर टायरकिलिंग बेल्ट देखील लावण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वर्षा अखेरीस पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल २५ पैशांनी स्वस्त

News Desk

महीला आयएएस अधिकारी लैंगिक छळाची शिकार

News Desk

दुर्घटनाग्रस्त झालेल्या लष्कराच्या हेलिकॉप्टरमध्ये CDS बिपीन रावत यांच्यासह कोण कोण होते?

News Desk