HW News Marathi
Covid-19

“ कोरोना बाबतीत अफवा पसरवणाऱ्यांची संपत्ती जप्त करा”

उत्तरप्रदेश | देशात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने, रोज लाखांच्या संख्येत नवीन कोरोना रूग्ण आढळून येत आहे. परिणामी रूग्णालयांमध्ये बेड,ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, रेमडेसिविर इंजेक्शनसह लसींचा तुटवाडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांकडून केंद्रकाडे वारंवार मदत मागितली जात आहे. मात्र उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना एक विशेष आदेश दिला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथा यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोशल मीडियावर फेक न्यूज व अफवा पसरवून वातावरण खराब करणाऱ्यांची संपत्ती जप्त करा आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत..द हिंदू ने दिलेल्या बातमीनुसार, मुख्यमंत्री आदित्यानात यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या एक उच्चस्तरीय बैठकीत, औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर व अफवा पसरवून वातावरण बिघडवण्यांचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात एनएसए आणि गँगस्टर अॅक्ट अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यातील कोणत्याही कोविड रूग्णालयात ऑक्सिजनचा कुठलाही तुटवडा नाही. समस्या काळाबाजार आणि साठेबाजीची आहे, ज्या विरोधात कडक कारवाई केली जाईल. आम्ही आयआयटी कानपूर, आयआयएम लखनऊ आणि आयआयटी बीएचयू सोबत मिळून ऑक्सिजनचे एक ऑडिट करणार आहोत, जेणेकरून त्याची व्यस्थित देखरेख होऊ शकेल. प्रत्येक बाधित व्यक्तीस ऑक्सिजनची गरज लागत नाही, यासंबंधी जागृती करण्यासाठी माध्यमांकडून सहकार्याची अपेक्षा आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पुण्यातील इतर दुकानं सुरु, पण मॉल्स का बंद?’, अजित पवारांनी सांगितलं कारण  

News Desk

गेल्या २४ तासांत राज्यात १४ हजार २३८ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या ४७ हॉटेलवर पुण्यात कारवाई!

News Desk