HW News Marathi
देश / विदेश

ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन

मुंबई । हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे आज (४ एप्रिल) मुंबईत राहत्या घरी निधन झाले आहे. शशिकला यांनी वयाच्या ८८ वर्षी अखेरचा श्वास घेतला. फिल्मफेअरचे संपादक जितेश पिल्लई यांनी सोशल मीडियावर याबाबतचे वृत्त शेअर केले आहे.

शशिकला यांचा अल्प परिचय

शशिकला यांचे पूर्ण नाव शशिकला जावळकर होते. सोलापुरात ४ ऑगस्ट १९३२ रोजी त्यांचा जन्म झाला. शशिकला यांनी ७० च्या दशकात मुख्य अभिनेत्री आणि खलनायिका अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका साकारल्या. शशिकला यांनी २००५ सालापर्यंत एकूण १०० चित्रपटांमधून आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना भुरळ पाडली. अत्यंत नावाजलेल्या व श्रेष्ठ निर्मात्यांसोबत शशिकला यांनी काम केले.

शशिकला यांचे गाजलेले चित्रपट

‘नौ दो ग्यारह’, ‘कानुन’, ‘जंगली’, ‘हरियाली और रास्ता’, ‘अनपढ’, ‘यह रास्ते हैं प्यार के’, ‘वक्त’, ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘नीलकमल’, ‘तीन बहुरानियाँ’, ‘हमजोली’, ‘सरगम’, ‘क्रांती’, ‘रॉकी’, ‘बादशहा’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चोरी चोरी’ (२००३) इत्यादी.

‘या’ पुरस्कारांनी सन्मानित

भारत सरकारकडून २००७ साली शशिकला यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तर, २००९ साली शशिकला यांना व्ही. शांताराम लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

PM Care फंडांमध्ये जमा केलेले पैसे NDRF मध्ये हस्तांतरित केले जाऊ शकत नाहीत – सुप्रीम कोर्ट

News Desk

भारतीय अंतराळवीर आता जाणार आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर

Gauri Tilekar

नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात CRPF चे आठ जवान शहीद

News Desk