HW News Marathi
देश / विदेश

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्यावर आज लोधी स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

नवी दिल्ली | ज्येष्ठ पत्रकार आणि एच. डब्ल्यू. न्यूज नेटवर्कचे सल्लागार संपादक विनोद दुआ यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. दुआ यांनी काल (४ डिसेंबर) वयाच्या ६७ वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. दुआ यांच्यावर आज (५ डिसेंबर) दुपारी १२ वाजता लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. दुआ यांच्या अंत्यसंस्काराची माहिती त्यांची कन्या मल्लिका दुआ यांनी इंस्टाग्राम स्टोरीद्वारे ही माहिती दिली आहे.

दुआ यांना २८ नोव्हेंबरला रात्री परमानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परमानंद रुग्णालयात उपचार सुरू होते. यानंतर डॉक्टरांच्या सल्लानुसार दुआ यांना २९ नोव्हेंबरला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपोलो रुग्णालयात दुआ यांना आसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. गेल्या काही महिन्यापासून दुआ यांची प्रकृती खालवत गेली. काहीच महिन्यांपूर्वी दुआ यांच्या पत्नी चिन्ना दुआ यांचे कोरोनाने निधन झाले.

मल्लिका दुआ यांनी इंस्टाग्राम स्टोरीत म्हटले, “निर्भिड आणि असामान्य माझे वडिल विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. माझ्या वडिलांनी एक अतुलनीय जीवन जगले. त्यांनी आपल्या आयुष्याची ४२ वर्षे फक्त आणि फक्त सत्याचीच कास धरत पत्रकारीतेला दिली. ते आता माझे वडिल आईसोबत स्वर्गात असतील.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात सरकार काहीतरी लपवून ठेवत आहे !

Gauri Tilekar

गांधी हा एक परिवार नसून या देशाचं DNA आहे – यशोमती ठाकूर 

News Desk

नोटबंदीनंतर देखील निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर !

News Desk