HW News Marathi
देश / विदेश

अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरमध्ये हिमस्खलनात अडकलेल्या ७ भारतीय जवानांचा मृत्यू

मुंबई | अरुणाचल प्रदेशमध्ये कामेंग सेक्टरमध्ये हिमस्खलन झाले असून यात ७ जवानांचा मृत्यू झाला आहे. भारतीय लष्कराने यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच हिमस्खलनात मृत पावलेल्या ७ जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. हे सातही जवान ६ फेब्रुवारी रोजी कामेंग सेक्टरमधील उंचावलेल्या ठिकाणी अडकले होते. या जवानांना लष्कराकडून शोधन्यांचे काम सुरू होते. 

अरुणाचल प्रदेशमध्ये कामेंग जिल्ह्यातील रुपा शहरात तब्बल दोन दशकानंतर बर्फवृष्टी झाली होती. या ठिकाणी हिमस्खलन झाले ते ठिकाण हे समुद्रसपाटीपासून जवळपास १४ हजार ५०० फुटांच्या उंचीवर आहे. गेल्या काही दिवसांपासून कामेंग जिल्ह्यात हवामान खराब झाले होते, अशी माहिती लष्कराने दिली आहे. दरम्यान, मे २०२० मध्ये सिक्कीममध्ये अशाच प्रकारची घटना झाली होती. त्यावेळी दोन जवानांचा मृत्यू झाला होता. आणि या घटनेत ११ जवानांचा मृत्यू झाला आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

21 नावाने दाऊदचा जगभर वावर

News Desk

किरिट सोमय्यांच्या विरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल | अतुल लोंढे

Gauri Tilekar

दिल्लीसह ‘ही’ २ राज्य वगळून आज देशभर शेतकऱ्यांचा चक्काजाम

News Desk