HW News Marathi
देश / विदेश

शहा-मोदी जोडीवर पुन्हा टीका

दिल्ली- अर्थव्यवस्थेच्या अधोगतीवरून मोदी सरकारला धारेवर धरणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजप नेते यशवंत सिन्हा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे महाभारतातील शल्याची उपमा दिली होती. अर्थकारणाच्या या लढाईत काहीजण सरकारला हिणवून निराशा वाढेल, अशी विधाने करत आहेत.

महाभारतात कर्णाचा सारथी असलेल्या शल्याने हेच केले होते, असे सांगत मोदींनी सिन्हा यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला होता. मोदींच्या या टीकेला सिन्हा यांनीही अप्रत्यक्षपणेच उत्तर दिले. ते काल दिल्लीत काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी लिहलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी बोलत होते. यावेळी सिन्हा यांनी उपस्थितांना संसदीय लोकशाही वाचवण्यासाठी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. तसेच भीती आणि लोकशाही या गोष्टी एकत्र नांदू शकत नसल्याचेही त्यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुजरात विधानसभेत राडा, काँग्रेस आमदारानं भाजप आमदाराला पट्ट्यानं मारहान

News Desk

महाराष्ट्र दिनाच्या पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

News Desk

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे ‘कोरोना निगेटिव्ह’

swarit