HW News Marathi
देश / विदेश

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचे निधन

मुंबई। ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू स्पिनर शेन वॉर्न यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले आहे. वॉर्न यांचे आज (४मार्च) वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले आहे. वॉर्न यांच्या अचानक जाण्याने क्रिकेट विश्वास शोककळा पसरली आहे. वॉर्न हे थायलंडमधील व्हिलामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. यानंतर वॉर्न यांना वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. 

वॉर्न यांचे १९९२ मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते यानंतर वॉर्न यांनी त्यांच्या क्रिकेट जगतातील कारकिर्दीत १४५ कसोटी सामने खेळले असून यात ७०८ विकेट्स आणि१९४ एकदिवसीय सामन्यात २९३ विकेट्स घेतले आहेत. वॉर्न यांनी २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेतली होती. निवृत्तीनंतर ही वॉर्न यांनी आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सचे कर्णधार होते. एवढेच नव्हे तर त्यांनी आयपीएलची जेते पदाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहण्याच्या व्यसनाने 7 मुलींचे केले लैंगिक शोषण 

News Desk

जेएनयूतील विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत ‘लेफ्ट अलायन्स’चा विजय

Gauri Tilekar

काँग्रेसचा आम आदमी पक्षाला जोरदार धक्का 

News Desk