HW News Marathi
देश / विदेश

शरद पवारांनी अमित शहांची भेट घेतली? महाविकासआघाडी सरकारची समीकरणे बदलणार?

मुंबई | सचिन वाझे प्रकरण आणि त्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांनंतर राज्यातील राजकीय घडामोडींवर वेग आला आहे. मोठ्या सुरु आहेत. त्यातच महाविकास आघाडीतील एका पक्षाच्या नेत्यांनी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याबरोबर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती ‘दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर या भेटीचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.

दरम्यान, जर शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतली असेल तर राज्यात असलेल्या शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारवर त्याचा काय परिणाम होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.राज्यात येत्या काळात नवीन समीकरणं तयार होणार का? महाविकास आघाडीची सत्ता जाणार का? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत.

राजकारणात अशक्य असं काहीच नसतं. मात्र राज्याच्या राजकारणात सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर महाविकास आघाडीतून एखादा पक्ष बाहेर पडून वेगळी भूमिका घेईल अशी चिन्ह नाही. महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. भाजपसोबत जाणार नाही, ही त्यांची भूमिका स्पष्ट आहे, असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी सांगितलं आहे. तसे, एबीपी माझाने लिहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिहारमध्ये पुन्हा नितीशराज! NDA ने बहुमत मिळवत राखली सत्ता

News Desk

ब्रिटनच्या गृहमंत्री पदी भारतीय वंशाच्या प्रीती पटेल

News Desk

भारतासाठी लष्करी कारवाईचा पर्याय खुला – बिपिन रावत

News Desk