नवी दिल्ली | भारतात कोरोनावर मात करण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्विन हे औषध प्रभावी ठरत आहे. त्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी विनंती यानंतर भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्विन गोळयांच्या निर्यातीवरील निर्बंध हटवले नाहीत तर, जशास तसे उत्तर देण्यात येईल, अशी धमकीवजा इशारा दिला होता. दरम्यान, त्यांच्या या धमकीला शशी थरुर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Never in my decades of experience in world affairs have I heard a Head of State or Govt openly threatening another like this. What makes Indian hydroxychloroquine "our supply", Mr President? It only becomes your supply when India decides to sell it to you. @USAndIndia https://t.co/zvSPEysTNf
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) April 7, 2020
कोरोना व्हायरसमुळे सध्या अमेरिका अत्यंत बिकट परिस्थितीत आहे,३ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे.आता या सगळ्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकीवजा इशारा दिला आहे. भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन (hydroxychloroquine) औषधाच्या निर्यातीवरील बंदी घातली आहे. ही बंदी जर हटवला नाही तर आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो. कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी सध्या या औषधाचा वापर केला जात आहे. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे औषधासाठी विनंती केली आहे.
दरम्यान, भारत सरकारने ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. आता अमेरिकेसह ‘कोरोना’बाधित शेजारी देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पुरविण्याचा निर्णय भारत सरकराने घेतला आहे. देशांना माणुसकीच्या नात्याने पॅरासिटामॉल आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पुरवणार असल्याचे भारताने सांगितले. भारत सरकारने व्हिटॅमिन बी 1 आणि बी 12 यासह 24 औषधांच्या निर्यातीवरील निर्बंध शिथिल केले आहेत. यामुळे आता ही औषधे निर्यात केली जातील. मात्र पॅरासिटामॉल आणि त्यापासून बनविलेल्या इतर औषधांवर निर्यातीवरील निर्बंध पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.