HW News Marathi
देश / विदेश

ती सेक्स सीडी बनावट, हार्दिकचे भाजपवर आरोप

अहमदाबादः पाटीदार सामाजाचे नेते हर्दिक पटेल यांच्याबाबतची सेक्स सिडी चव्हाट्यावर आल्यामुळे गुजरात निवडणुकीपूर्वी उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. काहींना हा भाजपने केलेला कांगावा वाटत आहे, तर काहींनी हर्दिक पटले यांचे लफडं खरे वाटत आहे. परंतु यावरून आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. तरीही हार्दिक पटेल यानं विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी मर्द आहे. नपुंसक नाही. जे काही करायचं असेल तर छातीठोक करेन,’ असं हार्दिकनं म्हटलं आहे. हे सगळं भाजपचं कट-कारस्थान असल्याचा थेट आरोपही त्याने केला आहे. त्या सीडीतील मुलगा आपण नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहेत.

हार्दिक पटेल एका हॉटेलच्या रूममध्ये तरुणीसोबत अश्लील चाळे करत असल्याचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. आगामी गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल हा महत्त्वाचा फॅक्टर ठरलेला असतानाच ही सीडी उघड झाल्यानं गुजरातच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरून उलटसुलट चर्चेला उधाणही आलं आहे. हार्दिकनं मात्र सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘ही सेक्स सीडी बनावट आहे. भाजपच्या घाणेरड्या राजकारणाचा हा भाग आहे. भाजपनं माझ्या खासगी आयुष्यावरच हल्ला केला आहे. ‘असले’ उद्योग करणारे भाजपमध्ये अनेक लोक आहेत. मी सुद्धा लवकरच त्यांची पोलखोल करणार आहे,’ असा इशारा त्यानं दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवाज शरीफ यांना सात वर्षांची सजा

News Desk

धक्कादायक: नर्सरीच्या मुलांवर दारू ओतून आग लावली 6 चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू

News Desk

हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, नागरिकत्व विधेयक पुन्हा मांडणार ?

News Desk