HW News Marathi
देश / विदेश

रुग्णालयाने हाकलल्याने तिने रिक्षात दिला बाळाला जन्म

सहारनपूर (उ. प्र.) – उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यातील माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. बाळंत होण्यासाठी अखेरच्या क्षणी रुग्णालयात आलेल्या महिलेला येथील जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धक्के देत निदर्यीपणे हाकलून काढल्याने रिक्षातच तिची प्रसुती झाली. नातेवाईक तिला दुसऱ्यारुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करीत असताना ई-रिक्षा हा प्रकार घडला. दरम्यान, बुधवारी थाना जनकपुरीमध्ये याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.सोमवारी रात्री सहारनपूर जिल्हा रुग्णालयात खजूरतलाचे रहिवासी मोहम्मद रईस यांच्या पत्नी मुनव्वरला प्रसुती वेदना सुरू झाल्या होत्या. तिला घेऊन शेजारीण आणि काही नातेवाईक जिल्हा रुग्णालयात आले. मुनव्वरला तिथे दाखलही करण्यात आले. मात्र डॉक्टरांना बोलावण्याऐवजी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनीतपासणी करताच मुनव्वर यांना धक्का देऊन बाहेर हाकलले, असा आरोप नातेवाईकांकडून केला जातो आहे.

दरम्यान, मुनव्वरला ई-रिक्शातून अन्य रुग्णालयात हलवित असताना ई-रिक्षामध्येच त्यांना बाळाला जन्म दिला. आता मुन्नवर आणि नवजात बाळ दोघांचीही प्रकृती ठिक असल्याची माहिती मिळते आहे. बुधवारी मुनव्वर यांचे पती मोहम्मद रईस यांनी थाना जनकपुरीला जाऊन या प्रकरणातील कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षलवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद

News Desk

पीएमसी बँकेच्या खातेधारकांनी अर्थमंत्र्यांना घेरले, गव्हर्नरशी चर्चा करणार

News Desk

‘खेलरत्न पुरस्कारचं नामकरण ही लोकभावना नसून हा तर राजकीय खेळ’, संजय राऊतांची मोदींवर टीका

News Desk