HW News Marathi
देश / विदेश

भिकाऱ्यांपुढे दुसरा पर्याय काय असू शकतो, सामनातून पाकिस्तानवर टीका

मुंबई । इम्रान खान यांना ‘कतार एअरवेज’च्या विमानाने वॉशिंग्टनला जावे लागले व राहण्याखाण्याचा खर्च वाचविण्यासाठी वॉशिंग्टनमधील पाक दूतावासात पथारी पसरावी लागली. पाकिस्तानात लोकशाही नाही. ते एक इस्लामिक स्टेट आहे. तिथे संसद, सरकारवर लष्कराची हुकमत चालते. हे सर्व आधी मोडून काढावे लागेल. पाकिस्तानची घटना व राज्यपद्धती बदलून नवी दिशा द्यावी लागेल व ते इम्रान खान यांच्या हातात नाही. पाकिस्तानात ‘जागतिक’ सैन्य घुसवून इम्रान सांगतात त्या 30-40 हजार दहशतवाद्यांचा साफ खात्मा करावा लागेल व त्यासाठी पाक राज्यकर्त्यांचा पाठिंबा लागेल. पाक जनतेलाही विकास हवा आहे. सुखी, शांत जीवन जगायचे आहे. पण ते शक्य झालेले नाही. कारण पाकच्या जन्मापासून चुकलेली आर्थिक व राजकीय धोरणे. धार्मिक द्वेषावर निर्माण झालेल्या राष्ट्राच्या नशिबी जे भोग येतात ते पाकची जनता भोगत आहे. बॅ. जीना कबरीत विसावले, पण त्यांनी निर्माण केलेला पाकिस्तान मात्र नरकात एखाद्या डुकरासारखा लोळत आहे. संपूर्ण जग आज पाकिस्तानचा तिरस्कार करीत आहे. पाकिस्तान हे राष्ट्र उरले नसून दहशतवाद्यांना पोसणारी टोळी बनली आहे. आतंकी पाक लष्कर व ‘आयएसआय’चे जावई आहेत. इम्रान खान यांना त्यांना संपवता येणार नाही. इम्रान यांना पाकिस्तानला खरोखर दहशतवादमुक्त करायचे असेल तर ‘जागतिक’ सैन्य घुसवून साफसफाई करावी लागेल. घाण साफ करण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची क्षमता हवी. इम्रान स्वतःच पाक लष्कराची निर्मिती आहे. लष्कराच्याच मेहेरबानीने ते जगत आहेत. वॉशिंग्टन येथे जाऊन त्यांनी सत्य सांगितले ही त्यांची मजबुरी होती. भिकार्‍यांपुढे दुसरा पर्याय काय असू शकतो? अशी प्रतिक्रिया सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

सामनाचा आजचा अग्रलेख

पाकिस्तानात 30-40 हजार दहशतवादी आहेत व त्यांच्यावर पाकिस्तानी सरकारचे नियंत्रण नाही. हेआतंकी पाक लष्कर व ‘आयएसआय’चे जावई आहेत. इम्रान खान यांना त्यांना संपवता येणार नाही. इम्रान यांना पाकिस्तानला खरोखर दहशतवादमुक्त करायचे असेल तर ‘जागतिक’ सैन्य घुसवूनसाफसफाई करावी लागेल. घाण साफ करण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची क्षमता हवी. इम्रान स्वतःचपाक लष्कराची निर्मिती आहे. लष्कराच्याच मेहेरबानीने ते जगत आहेत. वॉशिंग्टन येथे जाऊन त्यांनीसत्य सांगितले ही त्यांची मजबुरी होती. भिकार्‍यांपुढे दुसरा पर्याय काय असू शकतो?

पाकिस्तानात 30 ते 40 हजार दहशतवादी असल्याची कबुली त्या देशाचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. इम्रानचा हा कबूलनामा त्यांनी अमेरिकेत जाऊन दिला आहे. पाकिस्तानात चाळीसच्या आसपास दहशतवादी संघटना असून त्यांच्या शिबिरात 30 ते 40 हजार दहशतवादी आहेत. हेच आतंकवादी कश्मीर आणि अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले करीत असल्याची कबुलीही इम्रान खान यांनी दिली. इम्रान यांनी स्वतःचाच मुखवटा फाडून फेकला आहे. ‘‘पाकिस्तानच्या आधीच्या सरकारांनी दहशतवादासंदर्भातील हे सत्य जगापासून लपवून ठेवले, मला जगापासून काहीच लपवायचे नाही’’, असेही इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे. इम्रान खान यांनी घेतलेली ही भूमिका आधीच्या सर्व सरकारांपेक्षा वेगळी आहे. पाकिस्तानचे सर्व सत्य त्यांनी मांडले. पाकिस्तानला लागलेल्या रोगाची त्यांनी माहिती दिली. या रोगापासून पाकला कायमची मुक्ती हवी असेल तर हिंदुस्थानसह संपूर्ण जग त्यांना सहकार्य करण्यास मागेपुढे पाहणार नाही. पाकिस्तानला लागलेला दहशतवादाचा कॅन्सर संपूर्ण जगाला मारत आहे. त्यामुळे पाकला या आजारातून मुक्ती देण्यासाठी जागतिक प्रयत्न व्हायला हवेत. अर्थात त्यासाठी इम्रान खान यांची प्रामाणिक इच्छा हवी. हिंदुस्थान व पाकिस्तानात कश्मीर हा वादाचा मुद्दा असू शकतो, पण पन्नास वर्षे युद्ध आणि दहशतवादाचा मारा करूनही कश्मीरच्या इंचभर तुकड्यावरही त्यांना पाय रोवता आले नाहीत. उलट याकामी निर्माण केलेल्या दहशतवादाने पाकिस्तानचाच घास घेतला. कश्मीरच्या लढाईत

पाकिस्तान इतका कंगाल

झाला की, काल इम्रान खान यांना ‘कतार एअरवेज’च्या विमानाने वॉशिंग्टनला जावे लागले व राहण्याखाण्याचा खर्च वाचविण्यासाठी वॉशिंग्टनमधील पाक दूतावासात पथारी पसरावी लागली. पाकिस्तानात लोकशाही नाही. ते एक इस्लामिक स्टेट आहे. तिथे संसद, सरकारवर लष्कराची हुकमत चालते. हे सर्व आधी मोडून काढावे लागेल. पाकिस्तानची घटना व राज्यपद्धती बदलून नवी दिशा द्यावी लागेल व ते इम्रान खान यांच्या हातात नाही. पाकिस्तानात ‘जागतिक’ सैन्य घुसवून इम्रान सांगतात त्या 30-40 हजार दहशतवाद्यांचा साफ खात्मा करावा लागेल व त्यासाठी पाक राज्यकर्त्यांचा पाठिंबा लागेल. पाक जनतेलाही विकास हवा आहे. सुखी, शांत जीवन जगायचे आहे. पण ते शक्य झालेले नाही. कारण पाकच्या जन्मापासून चुकलेली आर्थिक व राजकीय धोरणे. धार्मिक द्वेषावर निर्माण झालेल्या राष्ट्राच्या नशिबी जे भोग येतात ते पाकची जनता भोगत आहे. बॅ. जीना कबरीत विसावले, पण त्यांनी निर्माण केलेला पाकिस्तान मात्र नरकात एखाद्या डुकरासारखा लोळत आहे. संपूर्ण जग आज पाकिस्तानचा तिरस्कार करीत आहे. पाकिस्तान हे राष्ट्र उरले नसून दहशतवाद्यांना पोसणारी टोळी बनली आहे. हिंदुस्थानात तर पाकड्यांनी दहशतवाद्यांना खतपाणी घातलेच, पण अफगाणिस्तानही पाकवर सतत हाच आरोप करीत आला आहे. तालिबान, हक्कानी नेटवर्क, जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तोयबा अशा दहशतवादी संघटना अफगाणिस्तानातही धुमाकूळ घालत आहेत. इम्रान आता म्हणतात, पाकिस्तानात

दहशतवाद फोफावला

आहे व आधीच्या सरकारांची दहशतवाद्यांशी लढण्याची इच्छाशक्ती नव्हती. इम्रान यांचा दावा आहे की, त्यांच्या सरकारने दहशतवादाविरुद्ध लढाई सुरू केली आहे. इम्रान यांचे हे म्हणणे तर्कसंगत नाही. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेणारा हाफीज सईद हा आजही पाक लष्कराचा लाडका आहे. अमेरिकेचा दबाव व ‘युनो’चा दणका मिळाला नसता तर आज हाफीज सईदवर जी थातूरमातूर कारवाई झाली आहे तीदेखील झाली नसती. हिंदुस्थानला हवे असलेले दाऊदपासून शकीलपर्यंत सर्व दहशतवादी पाकिस्तान स्वतःच्या भूमीवर पोसते आहे. हाफीज सईद हा जणू जीना यांच्या कबरीतून जन्माला आला आहे असे त्याचे कौतुक केले जात आहे. हे सर्व हिंदुस्थानातील दहशतवादी कारवायांचे गुन्हेगार आहेत. त्यांना एकतर पाकिस्तानने हिंदुस्थानच्या हवाली करावे, नाहीतर त्यांचे ‘मुडदे’ हिंदुस्थानला ‘नजर’ करावेत. तरच इम्रान खान यांचा प्रामाणिकपणा मान्य करता येईल. पाकिस्तानात 30-40 हजार दहशतवादी आहेत व त्यांच्यावर पाकिस्तानी सरकारचे नियंत्रण नाही. हे आतंकी पाक लष्कर व ‘आयएसआय’चे जावई आहेत. इम्रान खान यांना त्यांना संपवता येणार नाही. इम्रान यांना पाकिस्तानला खरोखर दहशतवादमुक्त करायचे असेल तर ‘जागतिक’ सैन्य घुसवून साफसफाई करावी लागेल. घाण साफ करण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची क्षमता हवी. इम्रान स्वतःच पाक लष्कराची निर्मिती आहे. लष्कराच्याच मेहेरबानीने ते जगत आहेत. वॉशिंग्टन येथे जाऊन त्यांनी सत्य सांगितले ही त्यांची मजबुरी होती. भिकार्‍यांपुढे दुसरा पर्याय काय असू शकतो?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक आहे !

swarit

आईचे दूध मिळत नसल्याने दरवर्षी अडीच लाख बालकांचा मृत्यू

News Desk

रेल्वेगाडी 20 सेकंद लवकर सोडल्यामुळे प्रवाशांची माफी, जपानच्या खाजगी रेल्वेकंपनीने मागितली माफी

News Desk