HW News Marathi
देश / विदेश

हाफिज सईदला ही खरी अटक आहे की अटकेचे ‘नाटक’ !

मुंबई | मुंबईवरील ‘26/11’ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याला अखेर पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. अर्थात ही खरी अटक आहे की अटकेचे ‘नाटक’ आहे हे पाकिस्तान आणि त्या हाफिजलाच माहीत. मुळात हाफिज सईदला ही अटक मनीलॉण्डरिंग आणि दहशतवादी कारवायांना रसद पुरविल्याप्रकरणी जो गुन्हा दाखल आहे त्यासंदर्भात झाली आहे. त्यामागे ‘फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स’ या जागतिक संघटनेचा दबाव कारणीभूत आहे. शिवाय आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर असलेला पाकिस्तान सध्या देशोदेशी कटोरा पसरून भीक मागत फिरत आहे आणि दहशतवादाचा पोशिंदा ही त्या देशाची प्रतिमा त्याआड येत आहे. दुसरीकडे त्यावरूनच ‘फायनान्शियल टास्क फोर्स’कडून ‘काळय़ा यादी’त टाकले जाण्याची भीतीही पाकिस्तानला सतावते आहे.

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान लवकरच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर हाफिज सईदच्या अटकेचा बनाव घडवून आणला गेला आहे का? दहशतवादाविरोधात आपण कारवाई करीत आहोत यासाठी या अटकेची धूळफेक केली गेली आहे का? पाकिस्तान सरकारने हाफिजला अटक करायची आणि नंतर न्यायालयाने त्याला जामिनावर मोकळे करायचे या नाटकाचे ‘यशस्वी’ प्रयोग आतापर्यंत दोनदा केले गेले आहेत. आता दिवाळखोरीच्या सावटाखाली असलेल्या पाकिस्तानने याच नाटकाचा तिसरा प्रयोग सादर केला आहे. ही आणखी एक धूळफेक आहे की नाही हे हाफिजविरोधातील खटला कसा चालतो यावर समजेल. हाफिज सईदला पाकिस्तानने केलेली अटक हे एक नाटक असल्याचा आरोप सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

सामनाचा आजचा अग्रलेख

पाकिस्तान सरकारने हाफिजला अटक करायची आणि नंतर न्यायालयाने त्याला जामिनावर मोकळेकरायचे या नाटकाचे ‘यशस्वी’ प्रयोग आतापर्यंत दोनदा केले गेले आहेत. आता दिवाळखोरीच्यासावटाखाली असलेल्या पाकिस्तानने याच नाटकाचा तिसरा प्रयोग सादर केला आहे. ही आणखी एकधूळफेक आहे की नाही हे हाफिजविरोधातील खटला कसा चालतो यावर समजेल. तोपर्यंत हाहिंदुस्थानी कूटनीतीचा, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकड्यांविरोधात निर्माण केलेल्या दबावाचा विजय आहेअसे म्हणायला हरकत नाही.

मुंबईवरील ‘26/11’ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याला अखेर पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. अर्थात ही खरी अटक आहे की अटकेचे ‘नाटक’ आहे हे पाकिस्तान आणि त्या हाफिजलाच माहीत. मागील काही काळापासून हिंदुस्थानने हाफिज सईदसंदर्भात जागतिक पातळीवरून पाकिस्तानवर दबाव निर्माण केला होता. हाफिज याला संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावे यासाठीही प्रचंड प्रयत्न केले होते. अमेरिका, इंग्लंडसह सर्व बडय़ा देशांनीही त्याला समर्थन दिले होते. मात्र नेहमीप्रमाणे चिनी माकडांचेच मांजर आडवे गेले होते. अखेर चीननेही विरोध सोडून दिल्याने संयुक्त राष्ट्रसंघाने हाफिजला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर केले. साहजिकच पाकिस्तानने त्याची सर्व मालमत्ता जप्त केल्याचा आणि त्याच्यावर निर्बंध लादल्याचा आव आणला होता. फेब्रुवारी महिन्यातही त्याची ‘जमात-उद-दवा’ ही दहशतवादी संघटना आणि तिला रसद पुरविणारी ‘फलाह-ए-इन्सानियत’ अशा दोन्ही संघटनांवर पाकिस्तानात बंदी घातली गेली. अर्थात हाफिज सईदविरोधात अशा कारवायांचे नाटक पाकिस्तानने यापूर्वी अनेकदा केले आहे. पाकिस्तानात सत्ताधारी अथवा लष्करशहा कोणीही असला तरी हाफिज सईद, त्याच्या दहशतवादी संघटना आणि त्यामार्फत हिंदुस्थानवर होणारे जिहादी हल्ले याबाबतीत पाकिस्तानचे धोरण

हाफिजच्या पारडय़ात वजन

टाकणारेच राहिले आहे. कारण हाफिज सईदचा बोलविता धनी आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर संघटना आहे. हिंदुस्थानात जो रक्तरंजित दहशतवादी हिंसाचार केला जातो त्यामागे आयएसआयचाच हात असतो हे उघड सत्य आहे. त्यामुळे कोणत्याही पाकडय़ा पंतप्रधानाने हाफिजवर कडक कारवाई करण्याचे धाडस आजपर्यंत केलेले नाही. तेव्हा विद्यमान पंतप्रधान इम्रान ते दाखवून आधीच गोत्यात असलेला आपला पाय आणखी खोलात घालतील याची शक्यता नाही. यापूर्वीही हाफिजला स्थानबद्ध केल्याचे नाटक पाकड्यांनी केले होतेच, पण दोन्ही वेळेस त्याची मुक्तता करण्यात आली. किंबहुना, या स्थानबद्धतेच्या काळात त्याची ज्या पद्धतीने बडदास्त ठेवण्यात आली त्यावरूनही पाकिस्तानचे नाटक स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता त्याला पुन्हा अटक झाली म्हणजे तो त्याच्या दहशतवादी संघटना आणि कारवाया संपल्या असे होणार नाही. त्याच्या या अटकेला हिंदुस्थानने त्याच्या आणि पाकिस्तानी दहशतवादाविरोधात जागतिक पातळीवर निर्माण केलेला प्रचंड दबाव नक्कीच कारणीभूत आहे, पण म्हणून इम्रान खानचे सरकार उद्या कोर्टात त्याच्याविरुद्ध सज्जड पुराव्यांची जंत्री सादर करेल, हाफिजच्या हातापायात साखळदंड पडतील, त्याला कोलू ओढावा लागेल आणि पाकिस्तानी न्यायालय मुंबई हल्ल्यातील निरपराध बळींसाठी अश्रू ढाळत त्याला देहदंडाची शिक्षा ठोठावेल असे समजण्याचे कारण नाही. मुळात हाफिज सईदला ही अटक

मनीलॉण्डरिंग आणि

दहशतवादी कारवायांना रसद पुरविल्याप्रकरणी जो गुन्हा दाखल आहे त्यासंदर्भात झाली आहे. त्यामागे ‘फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स’ या जागतिक संघटनेचा दबाव कारणीभूत आहे. शिवाय आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर असलेला पाकिस्तान सध्या देशोदेशी कटोरा पसरून भीक मागत फिरत आहे आणि दहशतवादाचा पोशिंदा ही त्या देशाची प्रतिमा त्याआड येत आहे. दुसरीकडे त्यावरूनच ‘फायनान्शियल टास्क फोर्स’कडून ‘काळय़ा यादी’त टाकले जाण्याची भीतीही पाकिस्तानला सतावते आहे. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान लवकरच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर हाफिज सईदच्या अटकेचा बनाव घडवून आणला गेला आहे का? दहशतवादाविरोधात आपण कारवाई करीत आहोत यासाठी या अटकेची धूळफेक केली गेली आहे का? पाकिस्तान सरकारने हाफिजला अटक करायची आणि नंतर न्यायालयाने त्याला जामिनावर मोकळे करायचे या नाटकाचे ‘यशस्वी’ प्रयोग आतापर्यंत दोनदा केले गेले आहेत. आता दिवाळखोरीच्या सावटाखाली असलेल्या पाकिस्तानने याच नाटकाचा तिसरा प्रयोग सादर केला आहे. ही आणखी एक धूळफेक आहे की नाही हे हाफिजविरोधातील खटला कसा चालतो यावर समजेल. तोपर्यंत हा हिंदुस्थानी कूटनीतीचा, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकड्यांविरोधात निर्माण केलेल्या दबावाचा विजय आहे असे म्हणायला हरकत नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यांनी ठरवलं तर पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होऊ शकतात!

News Desk

मोदी सरकारने काँग्रेसला संपवण्यासाठी सर्व प्रयत्न केले | सोनिया गांधी

News Desk

“गुजरातमध्ये ‘आप’चे सरकार येणार”, केजरीवालांची भविष्यवाणी

Darrell Miranda