भोपाळ | अवघ्या दीड वर्षात कमलनाथ यांनी २० मार्च रोजी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पडले. मध्य प्रदेश आज (२३ मार्च) मुख्रयमंत्र्यांच्या नाववर शिक्कामोर्तब होणार आहे. यानंतर आता भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी २००५ ते २०१८ असे तीनवेळा मुख्यमंत्रीपद भूषविले आहे.
Shivraj Singh Chouhan likely to take oath as Madhya Pradesh CM later today after BJP Legislative Party meeting. (file pic) pic.twitter.com/OepfHMycWC
— ANI (@ANI) March 23, 2020
मध्य प्रदेशमध्ये चौहान पुन्हा मुख्यमंत्री बनल्यास चौथ्यांदा एकच मुख्यमंत्री होणारे हे पहिलेच असणार आहेत. यापूर्वी शिवराज सिंहा यांच्या व्यतिरिक्त अर्जुन सिंह आणि श्यामाचरण शुक्ल यांनी तीनवेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये शिवराजसिंहांसह नरेंद्र सिंह तोमर आणि नरोत्तम मिश्रा यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी शिवराजसिंह यांच्या नावावर संमती दर्शविल्याचे सुत्रांनी सांगितले.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी ८ मार्च रोजी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत २२ आमदारांसह मंत्र्यांनी देखील राजीनामा दिला. काँग्रेसच्या आमदारांच्या राजीनाम्यानंतर भाजपने सर्वोच्च न्यायालय याचिका दाखल करुन मध्य प्रदेश विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली होती. यावर सर्वोच्च न्यायालय दिलेल्या निकालात तात्काळ बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. परंतु त्याआधीच कमलनाथ यांनी राजीनामा दिला. त्यामुळे काँग्रेसचे सरकार पडले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.