HW News Marathi
देश / विदेश

दादरा नगर हवेलीत घुमतोय शिवसेनेचा आवाज

दादरा-नगरहवेली | आज दादरा-नगरहवेली लोकसभा मतदार संघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल हाती येणार आलाय. आज सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली असून, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेला विजयाचा दावा खरा ठरताना दिसत आहे. शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच विजयी घडदौडीला सुरुवात केली होती.शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांना १८ हजार ९९२ तर भाजपच्या महेश गावित यांना १३ हजार ४८६6 मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या तर महेश धोदी यांना केवळ ७४७ 747 मते मिळाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार कलाबेन डेलकर या जवळपास ६ हजार मतांनी भाजपचे उमेदवार महेश गावित यांच्या पुढे आहे. त्यामुळे असाच निकाल हाती येत राहिला तर काळाबेन विजयी होणार, अशी चर्चा देखील सुरु होती

मतमोजणीच्या 11व्या फेरीनंतर शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी तब्बल 12932 मतांनी आघाडी घेतली

मतमोजणीच्या 11व्या फेरीनंतर शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी तब्बल 12932 मतांनी आघाडी घेतली आहे. शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांना आतापर्यंत 42002 मते मिळाली आहेत तर विरोधात असलेले भाजपचे उमेदवार महेश गावित यांना काही वेळापूर्वीपर्यंत 29070 मते मिळाली आहेत.मोहन डेलकर यांच्या कुटुंबातील व्यक्तीला तिकीट देऊन शिवसेनेने भाजपा-काँग्रेसविरोधात दंड थोपटले होते. भाजपाने येथील आदिवासी चेहरा महेश गावित यांना तिकीट दिले होते. कलावती डेलकर यांच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी त्यांचा मुलगा अभिनव डेलकर सांभाळत होता. या निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दादरा-नगर येथे जाऊन जोरदार प्रचार केला होता. कलावती डेलकर मोठ्या फरकाने निवडून येतील असा दावा संजय राऊत यांनी केला होता. तो प्रत्यक्षात आलेलं आपण पाहतोय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्तीसगढमध्ये मतदानापूर्वी नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट

News Desk

“…तर तुम्ही केंद्र सरकारलाही देशविरोधी म्हणाल का?”

News Desk

वासराशी महिलेचा विवाह

News Desk