HW News Marathi
देश / विदेश

अमेरिकेतील एच-४ व्हिसाधारकांना मोठा धक्का

वॉशिंग्टन | ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेत एच-४ व्हिसाधारकांना मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेत एच-४ व्हिसाधारकांना देण्यात आलेला नोकरीचा परवाना पुढील तीन महिन्यांत मागे घेण्यात येणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने आज (शनिवारी) फेडेरल न्यायालयात सांगितले आहे. या निर्णयामुळे अमेरिकेत कामानिमित्ताने राहणारे हजारो भारतीयांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. एच-१ व्हिसाधारकांच्या पती/पत्नीला नोकरी करण्यासाठी एच-४ व्हिसा दिला जातो. हा व्हिसा घेणाऱ्यामध्ये भारतीय मोठ्या प्रमाणावर आहेत.

अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात एच-१ व्हिसाधारकांच्या पती/पत्नीला नोकरी करण्याचा परवाना देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता ट्रम्प प्रशासन नेहमीप्रमाणेच आधीच्या शासनाचा हा देखील निर्णय रद्द करण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. या निर्णयाचा अमेरिकेत एच-४ व्हिसा असलेल्या तब्बल ७० हजार लोकांना मोठा धक्का बसणार आहे. यात भारतीयांची संख्या सर्वाधिकआहे.

सेव्ह जॉब्स अमेरिका‘ या संघटनेने ‘ट्रम्प प्रशासनाच्या धोरणामुळे अमेरिकेतील लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागणार असल्याचे’ म्हटले आहे. अमेरिकेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी, सहकार्यासाठी ही संघटना काम करत आहे. तसेच ट्रम्प प्रशासनाच्या या धोरणाविरुद्ध संघटनेने खटला दाखल केला आहे. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाकडून एच-४ व्हिसा संदर्भात निर्णय स्थगित ठेवला असल्याचे डीएचएस न्यायालयात सांगितले गेले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अत्याधुनिक रायफल्स उत्पादनाच्या रशियाच्या प्रस्तावाला मोदी सरकारचा नकार

News Desk

पंतप्रधान मोदींच्या सरकारचा पहिला निर्णय शहीद जवानांच्या मुलांसाठी

News Desk

शेतकरी १८ फेब्रुवारीला देशव्यापी रेल रोको आंदोलन करणार

News Desk