HW News Marathi
देश / विदेश

धक्कादायक ! एका सीआरपीएफ जवानाला पोलिसांकडून मारहाण

बारामती | जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या भीषण दहशतवादी शहीद झालेल्या जवानांच्या शोकसभेची परवानगी मागणाऱ्या एका सीआरपीएफ जवानाला बारामती पोलिसांनी बेड्या घालून मारहाण केल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. सीआरपीएफ जवान अशोक इंगवले असे मारहाण झालेल्या जवानाचे नाव आहे. ही मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी होत आहे.

सीआरपीएफ अशोक इंगवले हे ११८ बटालियनचे जवान आहेत. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या शोकसभेला जाण्यासाठी परवानगी मागण्यासाठी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र बारामती पोलिसांनी त्यांना बेड्या घालून मारहाण केली. या मारहाणीत ते जखमी झाले असून जवानाला मारहाण केल्याचे कळताच संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली.

पुलवामामध्ये जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील जनता आधीच प्रचंड संतप्त आहे. आता त्यातच एका जवानाला पोलिसांकडून करण्यात आलेली ही मारहाण निश्चितच अत्यंत संतापजनक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत हल्ला करेल या भीतीने पाकिस्तान धास्तावला !

News Desk

‘जबरदस्तीने तुम्हांला घरात बसवू ‘ तुकाराम मुंढेंचा नागपुरकरांना इशारा !

Arati More

भाजपच्या पराभवाची मालिका आता थांबणार नाही, पवारांनी केले ‘आप’चे अभिनंदन

swarit