HW Marathi
देश / विदेश

धक्कादायक ! राफेल कराराची महत्त्वाची कागदपत्रे चोरीला, महाधिवक्त्यांची माहिती

नवी दिल्ली | राफेल लढाऊ विमान करारासंबंधीची अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. राफेल प्रकरणी या पुनर्विचार याचिकेवर बुधवारी (६ मार्च) सुनावणी सुरू होती. या सुनावणीदरम्यान महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी १४ डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत “राफेल करारात कोणतीही अनियमितता नाही”, असे म्हणत याबाबतच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या होत्या. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली.

महाधिवक्ते म्हणतात, कागदपत्रे चोरीला जाण्यास ‘द हिंदू’ जबाबदार

विशेष म्हणजे, ‘द हिंदू’ने संरक्षण मंत्रालयातील राफेल बाबतच्या या कागदपत्रांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केल्याचा गंभीर आरोप करत महाधिवक्त्यांनी राफेल कराराची कागदपत्रे चोरी होण्याला ‘द हिंदू’ या वृत्तपत्राला जबाबदार ठरविले आहे.’द हिंदू’ या वृत्तपत्राने काहीच दिवसांपूर्वी गोपनीय कागदपत्रांच्या आधारे, पंतप्रधान कार्यालयाने राफेल लढाऊ विमान करारामध्ये हस्तक्षेप करुन समांतर वाटाघाटी केल्याचे वृत्त दिले होते. त्यामुळे महाधिवक्त्यांनी ही कागदपत्रे चोरीला जाण्याला ‘द हिंदू’ या वृत्तपत्राला जबाबदार धरले आहे.

“कागदपत्रे चोरी झाल्यानंतर सरकारने काय पावले उचलली ?”

“कागदपत्रे चोरी झाल्यानंतर सरकारने काय पावले उचलली ?”, असा असा सवाल विचारत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी माधिवक्त्यांना सुनावले आहे. “कागदपत्रे चोरी झाल्यानंतर सरकारकडून नेमकी काय पावले उचलली गेली याबाबत दुपारी २ वाजेपर्यंत संपूर्ण तपशील द्यावा”, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाधिवक्त्यांना दिला आहे.

Related posts

भारतीय जवानांनी पाकिस्तानचे १२ बंकर्सही उध्वस्त

News Desk

नवाझ शरीफ यांना पाकिस्तान सुप्रीम कोर्टाचा दणका

News Desk

दिल्ली व काश्मीर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, राज्यात हाय अ‍ॅलर्ट

News Desk