HW News Marathi
देश / विदेश

धक्कादायक ! भारतीय बँकाच्या घोटाळ्यात ७२ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली | आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये देशातील बँकांमध्ये तब्बल ४१ हजार कोटींचा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती आरबीआयच्या नुकत्याच सादर झालेल्या अहवालातून समोर येत आहे. हा घोटाळा भारतीय बँकांमधील विक्रमी घोटाळा असल्याचे म्हटले जात आहे. फेब्रुवारी महिन्यात नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी केलेल्या पीएनबी घोटाळ्यामुळे तब्बल १३००० कोटींचा अपहार झाल्याचे आरबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालात सादर केलेल्या माहितीनुसार, २०१७-१८ या आर्थिक वर्षात झालेल्या एकूण घोटाळ्यांपैकी ८० टक्क्यांहून अधिक घोटाळे ५० कोटींपेक्षाही जास्त रकमेचे आहेत.

गतवर्षीच्या तुलनेत घोटाळ्यात तब्बल ७२ टक्क्यांनी वाढ

आरबीआयच्या अहवालात दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१७-१८ मध्ये फसवणूकदारांमुळे भारतीय बँकांमध्ये तब्बल ४१,१६७.७ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. विशेष म्हणजे कडक देखरेख आणि दक्षता घेऊनही मागील वर्षाच्या (२०१६-१७) तुलनेत भारतीय बँकांमध्ये झालेल्या घोटाळ्यात तब्बल ७२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सायबरशी संबंधित घोटाळ्यांचे प्रमाण सर्वाधिक

आर्थिक वर्ष २०१७-२०१८ मध्ये ऑफ बॅलेन्स शीट ऑपरेशन्स, परकीय चलन व्यवहार, बचत खाते आणि सायबरशी संबंधित घोटाळे केंद्रस्थानी आहेत. या संपूर्ण आर्थिक वर्षात बँकिंग व्यवहारात झालेल्या सायबर फसवणुकीची संख्या मोठी आहे. या वर्षात झालेल्या तब्बल २०५९ इतक्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमुळे १०९.६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गतवर्षी १,३७२ सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमुळे ४२.३ कोटी रुपयांचा नुकसान झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना यूपीएमध्ये जाणार ‘या’ चर्चा केवळ माध्यमांमध्ये – राऊत

News Desk

वासराशी महिलेचा विवाह

News Desk

अनिल अंबानींकडून काँग्रेस, नॅशनल हेरॉल्डविरुद्धचा मानहानीचा खटला मागे

News Desk