नवी दिल्ली | कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर आळा घालण्यासाठी सरकार आणि आरोग्य यंत्रणा आटोकाट प्रयत्न करत आहे. देशात कोरोनाबाधितांचा आकडा हा १२ हजारांवर पोहोचला आहे. आणि त्यामूळे देशात लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामूळे लोकांना अत्यावश्यक सेवा घेण्यासाठीच घराबाहेर पडता येते. अर्थात आपल्या सगळ्यांनाच चमचमीत जेवण कायला नक्कीच आवडते. पण सद्य स्थितीला बर्गर, पिझ्झा जरी मिळत असला तरी तो खाणेही तितकेच धोक्याचे आहे.
नवी दिल्लीत एका पिझ्झा डिलेव्हरी बॉयला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. ज्या भागात हा रुग्ण राहतो तेथील ७२ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आल्याची माहिती एएनआयने ट्विटरवरुनही दिली आहे. या रुग्णावर उपचार सुरु असून त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध गेऊन त्यांना क्वॉरंटाईनही केले जात आहे.
A pizza boy has been detected with #COVID19 here. 17 other delivery boys linked with him have been placed under institutional quarantine and 72 people have been placed under home quarantine: Delhi Health Minister Satyendar Jain https://t.co/X7fbrA4hws pic.twitter.com/5c9aCftNXV
— ANI (@ANI) April 16, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.