May 24, 2019
HW Marathi
देश / विदेश

शोपियानमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर | शोपियान जिल्ह्यात रविवार (१८ नोव्हेंबर)ला भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात रेबन परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात भारतीय लष्कर, एसओजी आणि सीआरपीएफ यांनी संयुक्त मोहीम राबवित या दहशतवाद्यांना ठार केले.

 

शोपियान परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना सूत्रांकडून मिळाली होती. यानंतर जवानांनी शोधमोहिमेदरम्यान जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चकमकीनंतर घटनास्थळावरून एक एके-47 आणि पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. शिवाय, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळखही पटली आहे. अलबदर नवाज आणि आदिल अशी ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.

Related posts

ऊँ च्या प्रतिमेने बनवला जागतिक विक्रम

News Desk

जगातील पहिल्या डिझायनर बाळाचा जन्म, चिनी शास्त्रज्ञांचा अनोख्या प्रयोगाचा दावा

News Desk

अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

अपर्णा गोतपागर