HW News Marathi
देश / विदेश

‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ची आज पहिली बैठक होणार

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (५ फेब्रुवारी) श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट घोषणा केली होती. यानंतर आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर दिल्लीत राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टची पहिली बैठक होणार आहे. ट्रस्टची पहिली बैठक आज (१९ फेब्रुवारी) सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या बैठकीत राम मंदिर कसे आणि केव्हा होणार यांची चर्चा होणार असल्याची माहिती होणार आहे. या ट्रस्टची घोषणा झाल्यानंतर अवघ्या १४ दिवसांनंतर पहिली बैठक बोलवण्यात आली आहे.

या ट्रस्टमध्ये एकूण १५ सदस्य असतील ज्यातील ९ कायमस्वरुपी आणि ६ नामनिर्देशित सदस्य असणार आहेत. विश्व हिंदू परिषदेने गेली अनेक वर्षे मंदिर निर्मितीसाठी विविध आराखड्यांचा विचार केला आहे. त्यानंतर अंतिम आराखड्याचे रुप आले आहे. हा आराखडा हाच राममंदिराचे मूळ स्वरूप मानले जात आहे. या प्रस्तावित आराखड्यानुसार मंदिराची ऊंची १२० फूट असणार आहे. मंदिराची रुंदी १४० फूट तर मंदिर २७० फूट लांब असणार आहे. या दोन मजली इमारतीत २१२ स्तंभ असणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिनमध्ये आहे कुबेराची राजधानी, प्रत्येकाची कमाई ८० लाख

News Desk

#NirbhayaCase : आरोपींची पुनर्विचार याचिका फेटाळली, दोषींना फाशी अटळ

News Desk

न्यायाधीश शरद बोबडेनंतर एन.व्ही रमण होणार सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश

News Desk