बंगळुरू | कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल एसच्या सत्ताधारी आघाडीतील १३ आणि २ अपक्ष आमदारांनी राजीनामा दिल्याने आधीपासूनच सरकार पडण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटकातील राजकीय भूकंपामागे भाजपच्या नेत्यांचाच फक्त सहभाग नाही तर राष्ट्रीय स्तरावरील नेते अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांचाही सहभाग असल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेस-जेडीएसचे सरकार अस्थिर करण्याचा डाव असून हे लोकशाही आणि जनमताच्या विरोधात असून त्यांच्याकडून आमदारांना पैसा, पद आणि मंत्रीपदाची ऑफर दिली जात असल्याचा असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे. तसेच सरकारे अस्थिर करण्यामागे ही भाजपचा हात असल्याचा दावा केला आहे. असंविधानिक असून लोकांनी भाजपचे सरकार बनवण्याचा जनादेश दिलेला नाही. जनतेने आम्हाला सर्वाधिक मते दिली आहेत. काँग्रेस आणि जेडयूने मिळून ५७ टक्के मते मिळवली आहेत.
Siddaramaiah, Congress: We are also requesting the Speaker to take legal action under the anti defection law. We are requesting him in our letter to not only disqualify them but also bar them from contesting election for 6 years. #Karnataka https://t.co/kgadbFDG68
— ANI (@ANI) July 9, 2019
सिद्धरामय्या पुढे असे म्हणाले की, राजीनामे दिलेल्या आमदारकीचे राजीनामे देऊन भाजपसोबत हातमिळवणी करणाऱ्या बंडखोर काँग्रेस आमदारांचे पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे. तसेच विधानसभा अध्यक्षांकडे आम्ही त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणार आहोत असे म्हणाले. याआधी सिद्धरामय्या यांनी कर्नाटकात सर्व काही ठिक असून कुमारस्वामी सरकारला कोणताही धोका नसल्याचा दावा केला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.