HW News Marathi
देश / विदेश

प्रसिद्ध गायक केके काळाच्या पडद्याआड; पार्थिवाचे आज शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे गूढ उलघडेल

मुंबई | प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ ऊर्फ ‘केके’ यांचे हृदयविकाराचा तीव्र झटक्याने निधन झाले आहे. अवघ्या ५३ व्या वर्षी केके अखेरचा श्वास घेतला आहे. केकेंचे काल (३१ मे) कोलकात्त्यातील गुरुदास महाविद्यालयात आयोजित केलेल्या नाझरुल मंचच्या कार्यक्रमात त्यांनी गाणे गायले. केकेला लाईव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर केकेला काल रात्री डॉक्टरांनी मृत घोषित केले. केकेच्या अचानक जाण्याने देशभरात शोककळा व्यक्त केली जात आहे. 

केके यांचे कुटुंबीय कोलकोत्त्यात आले आहेत. कोलकात्त्याच्या न्यू मार्केट पोलीस ठाण्यात केकेच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामुळे केकेच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. केकेच्या पार्थिवाचे आज शवविच्छेदन केले जाणार आहे. असून कोलकात्ता पोलीस केकेाच मृत्यू शारिरीक आजाराने झाला की अन्य काही कारणा असल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट होईल. लाईव्ह कॉन्सर्टदर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते त्यांच्या हॉटेल रुममध्ये परत आले होते. तिथेच ते कोसळल्यानंतर केकेला सीएमआरआय रुग्णालयात दाखल केले. परंतु, रुग्णालयात दाखल होण्याआधीच केके यांचा मृत्यू झाला होता. 

केकेच्या मृत्यूची माहिती मिळाताच संगीत क्षेत्रातील दिग्गज आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे. मोदींनी ट्वीटमध्ये म्हणाले, “प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले आहे. के.के. त्याच्या गाण्यांमध्ये सर्व वयोगटातील लोकांमध्‍ये विविध प्रकारच्या भावनांचे प्रतिबिंब दिसून आले. त्यांच्या गाण्यातून आम्ही त्यांची आठवण कायम ठेवू. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. ओम शांती. “

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभा आणि विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनांचे बिगुल !

News Desk

सलमान खानचे ‘चित्रपट’ आणि ‘टीव्ही शो’ भविष्य अंधारात

News Desk

भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांनो छत्रपतींची बदनामी तुम्हांला मान्य ? राऊतांचा सवाल ..

Arati More