नवी दिल्ली | देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दर दिवशी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आता चिंता वाढली आहे. गेल्या २४ तासांत देशात आतापर्यंतच्या सर्वाधिक मोठ्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्याची नोंद झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत तब्बल ५२ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर एकाच दिवसात आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजेच तब्बल ७७५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, आतापर्यंत देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही १५ लाख ८३ हजार ७९२ इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात तब्बल ५२,१२३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंतच्या कोरोनामुळे झालेल्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. देशातील एक अत्यंत दिलासादायक बाब अशी कि, आतापर्यंत देशात तब्बल १० लाख २० हजार ५८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असताना केंद्राकडून आता देशात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊनसोबतच देशात ३१ ऑगस्टपर्यंत ‘अनलॉक ३’ची प्रक्रिया सुरु राहणार आहे.
Single-day spike of 52,123 positive cases & 775 deaths in India in the last 24 hours.
Total #COVID19 positive cases stand at 15,83,792 including 5,28,242 active cases, 10,20,582 cured/discharged & 34,968 deaths: Health Ministry https://t.co/ZakSSmhbNf pic.twitter.com/H5ktC0mvs7
— ANI (@ANI) July 30, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.