नवी दिल्ली | राजधानी दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी आरोग्य यंत्रणेवर ताण पडू लागला आहे. तसेच रुग्णांची संख्या दिवासागणिक वाढतच चालली आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दिल्ली सरकारनं सहा दिवसांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून (१९ एप्रिल) ते २६ एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू असणार आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना ही माहिती दिली.
आम्ही चाचण्या कमी केल्या नाहीत तर वाढवल्या आहेत. दिल्लीत रोज १ लाख चाचण्या होत आहे. आम्ही मृत्यूचे आकडेही लपवले नाहीत. दिल्लीत गेल्या २४ तासात २३ हजार ५०० रुग्ण आढळले आहेत. दिवसाला २५ हजार रुग्ण मिळत असतील तर आरोग्य व्यवस्था ढासळेल. दिल्लीत १०० पेक्षी कमी आयसीयू बेड आहेत. ऑक्सिजनसाठी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. औषधांचा तुटवडा जाणवत आहे. या सर्व गोष्टी पाहता दिल्लीमध्ये परिस्थिती गंभीर आहे.,” असं केजरीवालांनी म्हटलं आहे.
“दिल्लीमध्ये आणखी रुग्णांना दाखल करून घेणं शक्य नाही आणि लॉकडाउनला पर्याय नाही असं लक्षात आलं आहे. आज रात्री दहा ते पुढील सोमवार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लॉकडाउन राहणार आहे. यावेळी मेडिकल, खाण्यापिण्याची दुकानं सुरू राहतील. काय सुरू राहणार व काय बंद यासंबंधी सविस्तर माहिती लवकरच जाहीर करू,” असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.
It has been decided to impose a lockdown in Delhi, from 10 pm tonight to 6 am next Monday (26th April): Delhi CM Arvind Kejriwal pic.twitter.com/hBB2qXpxpM
— ANI (@ANI) April 19, 2021
दिल्लीत सहा दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करताना अत्यावश्यक सेवा सुरु राहतील अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली. तसंच लग्नासाठी फक्त ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी असून त्यासाठी पास दिले जातील असं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी सहा दिवसांचा लॉकडाऊन आहे त्यामुळे कोणीही दिल्ली सोडून जाऊ नका. आम्ही तुमची काळजी घेऊ असं आश्वासन दिलं. तसंच हा लॉकाडउन वाढवण्याची गरज भासू नये अशी अपेक्षाही व्यक्त केली.
In the next 6 days, we will make arrangements for more beds in Delhi. We thank Central govt for helping us. The lockdown period will be used to arrange oxygen, medicine. I request everyone to follow the guidelines: Delhi CM Arvind Kejriwal pic.twitter.com/NAdiHHH9bN
— ANI (@ANI) April 19, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.