पश्चिम बंगाल | पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात भाजपचे सहा कार्यकर्ते जखमी झाले आहेत. यामधील दोघांनी स्थिती गंभीर आहे. काल (५ मार्च) रात्री लग्नावरुन परतत असताना काही अज्ञातांकडून बॉम्बहल्ला करण्यात आला. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील रामपूर गावात बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला आहे. काल रात्री उशिरा झालेल्या बॉम्बस्फोटात सहा भाजप कार्यकर्ते जखमी झाले आहेत. या घटनेनंतर भाजपाने तृणमूल काँग्रेसवर आरोप केले आहेत. वृत्तसंस्था ‘एएनआय’च्या माहितीनुसार रामपूर गावात झालेल्या बॉम्बस्फोटात भाजपचे सहा नेते जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जखमी भाजप कार्यकर्त्यांनी हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेस असल्याचा आरोप केला आहे. आपण लग्नातून परतत असताना बॉम्बहल्ला करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. शोवन देबनाथ, विक्रम, अर्पण, स्वपन, महादेव अशी जखमी झालेल्यांची नावं असून यामध्ये अजून एकाचा समावेश आहे.
West Bengal: Six BJP workers injured in a crude bomb blast, in Rampur village of South 24 Parganas district late last night. The injured workers, who are under treatment at a hospital, allege that the bomb was hurled at them by TMC workers when they were returning from a wedding. pic.twitter.com/oSE3RjPC26
— ANI (@ANI) March 6, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.