इंदोर |देशात हल्लीच झालेल्या उन्नाव आणि कठुआ बलात्कार प्रकरणानंतर सर्वांना सुन्न करेल अशी घटना इंदोर मध्ये घडली आहे. इंदोरच्या सिंदोरा भागातील फुटपाथवर रहात असेलेल्या एका सहा महिन्यांच्या चिमुरडीवर २१ वर्षीय तरुणाने बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या बलात्कार व हत्या प्रकरणी पोलिसांनी सुनील भील नावाच्या तरुणाला अटक केली आहे. या चिमुरडीच्या शवविच्छेदन अहवाालात तीच्या गुप्तांगावर जबर जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पिडीत मुलगी आई व वडीलांसोबत इंदोरच्या सिंदोरा भागातील फुटपाथवर राहत होती. त्याच फुटपाथवर रहाणारा सुनील हा मुलीच्या वडिलांचा मित्र होता. शुक्रवारी सर्व झोपले असताना सुनीलने मुलीचे अपहण करुन जवळच असलेल्या एका इमारतीच्या तळघरात तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिला जमिनीवर आपटून तिची हत्या केली.
सकाळी मुलीचे आई वडील तीला शोधू लागले तेव्हा सुनीलने देखील त्यांच्यासोबत शोधाशोध करायला सुरुवात केली. त्याचवेळी एका ६ महीन्याच्या बाळाचा मृतदेह राजवाडा किल्ल्यासमोरील इमारतीत सापडल्याचे समजले. मुलीच्या आई वडिलांनी ती त्यांचीच मुलगी असल्याचे सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही तपासले असता त्यात मुलीच्या पालकांचे सांत्वन करणारा इसमच त्या मुलीला घेऊन इमारतीत आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यावेळी पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर हा गुन्हा आपणच केल्याचे सुनीलने कबुल केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.