HW News Marathi
देश / विदेश

स्मृती इराणींनी घेतली संस्कृतमधून शपथ

नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज राज्यसभा सदस्य पदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे इराणी यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली.

राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्या दोघांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शहा पहिल्यांदाच, तर इराणी दुसऱ्यांदा राज्यसभेवर गेल्या आहेत. गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. त्यात भाजपचे उमेदवार शहा आणि इराणी यांनी विजय मिळवला. तिसऱ्या जागेवर काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी विजय मिळवला. निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या दोन आमदारांची मते बाद ठरवल्यानंतर पटेल यांना विजयी घोषित केले. निवडणुकीत पराभूत झालेल्या बलवंतसिंह राजपूत यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर आक्षेप घेत गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी न्यायालयाने अमित शहा, स्मृती इराणी, अहमद पटेल यांच्यासह निवडणूक आयोगाला नोटीस बजावली असून २१ सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुजरातमध्ये पतंगाच्या मांज्यामुळे गळा कापला जाऊन ६ जणांचा मृत्यू

News Desk

महाराष्ट्राला १० पद्म पुरस्कार; महाराष्ट्र ठरला एक पद्मविभूषण तर दोन पद्मभूषणचा मानकरी

Aprna

फडणवीस सरकारने सांगितल्यामुळेच मी युक्तिवाद केला नाही ! मराठा आरक्षणाबाबत फडणवीसांवर गंभीर आरोप

News Desk