HW News Marathi
देश / विदेश

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या

बंगळुरु – बंगळुरुतील राहत्या घराबाहेर ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. त्या लंकेश पत्रिका या कन्नड साप्ताहिकाच्या त्या संपादिका होत्या. 55 वर्षीय गौरी लंकेश बंगळुरुतील राजराजेश्वरी नगरमध्ये राहत होत्या. मंगळवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास तिघा आरोपींनी त्यांना घराबाहेर बोलावलं. त्यांच्यासोबत झालेल्या वादावादीनंतर आरोपींनी गौरी यांच्यावर गोळ्या झाडून पसार झाला.

मारेकऱ्यांनी गौरी लंकेश यांच्यावर 50 मीटर अंतरावरुन सात गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या त्यांच्या छातीवर, तर एक त्यांच्या कपाळावर लागली. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या. गौरी यांच्याविरोधात गेल्यावर्षी मानहानीच्या दोन केसही दाखल करण्यात आल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांकडून आयईडी स्‍फोट, ६ जण जखमी

News Desk

पठाणकोट-जालंधर राष्ट्रीय महामार्गावर नाकेबंदीदरम्यान ४ संशयित ताब्यात

News Desk

ममता बॅनर्जी नावाची एकटी वाघीण ‘भाजप’ला पुरून उरेल!

News Desk